अस्ताला चाललेला…
तो भानू शांत क्लांत,
आणि उदास हताश धरा….
काय बरं सुचवते…..
व्याकुळ माझं मन ….
क्षितिजावर रंगबहार ..
तोही मिटत चाललाय ….
मनांतल्या जिर्ण आठवांसारखा….
सुखाला तोही पारखा…..
मंद दिवा तुळशीजवळ…
वा-याने थरथरणारा…
पेटलेला देहानं…
मात्र मनानं मिटू मिटू बघणारा…..
असं भोवती सावळलेलं…
दाटत चाललेला हा झाकोळ…
अन् मनातला आर्त कल्लोळ….
भरून आलेलं…
विरह वेदनेचं आभाळ…
कधीच रितं न होणारं…..
कातरवेळेला काळजात..
हुरहुरणारं एक वादळ…
दूरवर शून्यात बघत…
जिवाची सोसत असते..
जीवघेणी कळ….
कातरवेळ संपेस्तोवर….
कातरवेळ संपेस्तोवर…..।।
— रचना : अरुणा दुद्दलवार. यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800