Friday, March 28, 2025
Homeसाहित्यकाय ऱ्हवला काय हरावला

काय ऱ्हवला काय हरावला

माज्या होती लहानपनात,
दिवाळी लय येगळी !
गावासून बोटीन जायचं,
लुटूक मुम्बयची दिवाळी !

खोलयेची करीत साफसफाई,
रंगरंगोटी मग भितीची !
भांड्याकुंड्याची लकलकीत कलई,
घरात भरा ऊर्जा उत्साहाची !

शेजारधर्म मदतीचो,
हातभार लावीत फराळाक !
मनाजोगी खरेदी वरसाची,
श्रीमंती येय दिवाळीक !

मिठायो नि फराळ,
खाव येकदाच वरसाक !
नये कपडे नये चपला,
भेट मिळा सनाक !

सगळा सरला हया पिढीत,
रोजच त्येनची दसरो-दिवाळी !
पक्वान्नाची ऑरडर येता घरात,
कपडयांचे भेटी वेळोवेळी !

दाटीवाटीन शहरा वसली,
फट्याक्यांचो सोस सरलो !
मोकळी मैदाना दडली,
पतंगाचो खेळ सपलो !

वर्षा भाबल.

— रचना : सौ. वर्षा भाबल. नवी मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments