Friday, May 16, 2025
Homeबातम्याकाव्यरंगोत्सवानिमित्त हास्यकविता स्पर्धा

काव्यरंगोत्सवानिमित्त हास्यकविता स्पर्धा

विहंग प्रतिष्ठान, नेहरुनगर -कुर्ला,मुंबई या संस्थेच्या वतीने शनिवार, ३० मार्च रोजी काव्यरंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला पूर्व येथील नेहरुनगरमधील शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता हा काव्यरंगोत्सव होणार असून त्यानिमित्त हास्यकवितांची स्पर्धा घेण्यात आली आहे. इच्छुक कवीस्पर्धकांनी आपल्या कविता २६ मार्च पर्यंत vihangpratisthan2013@gmail.com या संकेतस्थळावर पाठवायच्या आहेत.

यातील प्रथम क्रमांकाच्या १० कवितांचे सादरीकरण काव्यरंगोत्सवात संबंधित कवीद्वारे करण्यात येईल. काव्यरंगोत्सवास लेखिका माधवी कुंटे, कवयित्री लता गुढे, कवयित्री चारुलता काळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालिका सायली वेलणकर या पाहुण्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

अधिक माहितीसाठी राजीव भांडारे (८१०८४३४८६४), राजश्री कदम (७७३८०५११४७), प्रसाद मोकाशी (९८६९०२०७२०) यांच्याशी संपर्क साधावा.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक