Thursday, January 16, 2025
Homeसाहित्यकुणीतरी कुणासाठी…

कुणीतरी कुणासाठी…

कुणीतरी येतंय
कुणीतरी जातंय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

कुणीतरी कुणाला
जीवापाड जपतंय
त्याच्यासाठी रात दिन
राबराब राबतंय…
ज्याच्यासाठी इतकं केलं…
तेच निघून जातय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

कुणासाठी आणायचे
चंद्र, सूर्य, तारे
गेला तो गेलाच
कोण मागे फिरे…
वाटेकडे डोळे लावून
कोण वाट पहातंय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

आईबाप, मुलंबाळं
असाच टाइमपास
नातीगोती, गणगोत
नुसता भाकड भास…
‘ गेला ‘, ते बरंच झालं
त्याच्या नावानं न्हातंय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

देशासाठी धर्मासाठी
प्राण देईन म्हणतो
याॅंव करीन, त्याॅंव करीन
काय वाटेल ते हाणतो…
पण हे काही खरं नाही
मनच मनाला खातंय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

आपल्या मर्जीनं नाही येणं
आपल्या मनानं नाही जाणं
सारं काही अधांतरी
याचं जराही नाही भान…
आळवावरचं पाणी तरीही
मनात मांडं खातंय…
नाहीतरी कोण इथं.. कायमचं -हातंय ?

— रचना : साहेबराव ठाणगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय