आयुष्यात आपल्याला नाऊमेद करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. त्यांचा बाऊ करायचा नसतो. तेवढा वेळ अल्पविराम देऊन आपण पुढे जायचं असतं. झाला मला कॅन्सर.. ठिक आहे; योग्य ते उपचार घेतले व मी बरी झाले. माझ्या या साऱ्या अनुभवांना शब्दबध्द करायची वेळ आली तेंव्हा मग पुस्तकाला ‘कॉमा’ हेच नाव यथार्थ वाटले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ विजया वाड, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ रेखा डावर यांच्या शुभहस्ते ते प्रकाशित झाले व हातोहात ती आवृत्ती संपली सुध्दा. यावर बनवण्यात आलेली डॉक्युमेण्टरी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशित झाली याचा मनस्वी आनंद असल्याची भावना कॅन्सरशी यशस्वी मुकाबला केलेल्या सौ अलका देवेंद्र भुजबळ यांनी श्री राजेंद्र घरत यांना “नवे शहर” यू ट्यूब चॅनल साठी दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
कॅन्सरशी लढा देताना आपण ज्या एमटीएनएलमध्ये नोकरी केली तेथील अनेक सहकारी, मित्र-मैत्रीणी यांनी दिलेला धीर, दिलासा, चौकशी फार मोलाची ठरली. आपली कन्या देवश्री ही जणू या काळात आपली माताच बनली होती. पती देवेंद्र यांनीही खचून न जाता आवश्यक ती काळजी घेतल्याने आजारपणाचा काळ सुसह्य झाला. कॅन्सर कुणालाही होऊ शकतो, त्यावरील उपचार हे खर्चिक आहेत म्हणून सर्वांनी विमा उतरवावा. तब्येतीस जपावे, प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. शक्यतो ताजे भोजनच सेवन करावे, वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शनही घेत रहावे असेही त्यांनी या मुलाखतीद्वारे सर्वांना आवाहन केले.
ही पूर्ण मुलाखत आपण पुढील लिंकवर पाहू शकता.
http://www.facebook.com/watch/?v=1000083120737651
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अलकाताई तुम्ही कणखर,धाडसी आहात .तुमच्यामुळे अश्या आजारातून जाणाऱ्या अनेकींना बळ मिळेल. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🥰
अलका मॅडम भाग्यवान आणि धाडसी,कणखर आहात..अनेक जणी अश्या प्रसंगी खेचून जातात. त्यांना तुमच्यामुळे बळ मिळेल. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🥰