Tuesday, July 1, 2025

“कॅरम”

आज पर्यंत आपण विविध विषयांवर कविता वाचल्या आहेत. आजच्या कवितेचा विषय आहे “कॅरम”. ही कविता लिहिली आहे गजाभाऊ लोखंडे यांनी.

अल्प परिचय :
श्री गजाभाऊ लोखंडे यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स वडाळा येथून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर एअर इंडिया मध्ये ३४ वर्षे सेवा केली.
व्यवस्थापक पदावर असताना त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. नोकरीत असतानाच त्यांनी एमबीए केले. गजाभाऊ यांना वात्रटिका, कविता, विडंबन, लेख लिहिण्याची आवड आहे. या बरोबरच विविध सामाजिक कार्यात ते सहभाग घेत असतात. ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात गजाभाऊंचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

कॅरम हा असतो एक गेम,
चिंता निवारक म्हणा
हवे तर,
त्यात असतो दम ! 1 !

सिंगल खेळा वा डबल,
जिंकल्यावर थोडे वाटते बरे !
नील गेम खाल्ल्यावर,
खुश होईल का कुणी खरे ! 2 !

कधी कधी पटकन जाणार्‍या,
सोंगट्या पण देतात धोका
प्रतिस्पर्धी चॅम्पियन असला
की मारतो मोका ! 3 !

कॅरम खेळण्याला वय नसते
एक एक मातब्बर खेळाडू,
चॅम्पियन होण्याची
संधी असते ! 4 !

कॅरम लावलाय स्टँडवर
दिवा आहे दिमतीला
ब्रेक करायचा मान तुम्हाला
खेळण्यास या सोबतीला ! 5 !

पाच दशकांपूर्वी कॅरमसाठी
लागायचे गल्लोगल्ली तंबू
हरल्यानंतर पैसे भरायचे,
लागायचे खिशाला बांबू ! 6 !

जिंकणारा उठायचा नाही,
विसरायचा काळ अन् वेळ
बुड्डे जरी झालो तरी
आवडतो कॅरम खेळ ! 7 !

गजाभाऊ लोखंडे

— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील