केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे अभ्यासक म्हणून देवेंद्र भुजबळ यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिराच्या कला दालनात “बॉर्डरलेस बाबासाहेब” या डॉ राजेंद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी हा सन्मान करण्यात आला.

अल्प परिचय :-
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, संचालक म्हणून आणि आता ‘न्यूज स्टोरी टुडे पोर्टल’ चे (www.newsstorytoday.com) संपादक असे गेली ४० वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.
दूरदर्शन मध्ये असताना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक पैलूवर आधारित माहितीपट, त्यावेळी राष्ट्रीय प्रसारणात हिंदीतून तर मुंबई दूरदर्शनवर मराठीतून प्रसारित झाला होता. या त्याकाळी खूप गाजलेल्या माहितीपटाची संकल्पना आणि निर्मिती सहभाग देवेंद्र भुजबळ यांचा होता.
बाबासाहेबांच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या आंदोलनावर आधारित माहिती पटाच्या निर्मितीत ही त्यांचा सहभाग होता.
तर माहिती खात्यात असताना मराठवाडा विद्यापीठाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर होण्यासाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने दूरदर्शन वर राबविलेल्या मोहिमेचे समन्वय श्री भुजबळ यांनी केले होते.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा त्यांचा संशोधन पर लेख महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकात तसेच अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या बरोबरच लोकराज्य मासिकाच्या हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतील आवृत्या मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विविध व्यक्तींनी “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टल वर लिहिलेले लेख, कविता यांचे संपादन करून तयार होत असलेले “बाबासाहेब आणि आम्ही” हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
श्रीमान भुजबळ साहेब
आपले खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन सर.
नमस्कार मंडळी.
आपण सर्व जेष्ठ,श्रेष्ठ व्यक्तींनी शुभेच्छा देऊन माझा हुरूप
वाढविला , या बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
आपला लोभ असाच कायम असू द्या,ही नम्र विनंती.
आदरणीय सर, आपले कार्य खरोखरीच स्तुत्य आहे. हार्दिक अभिनंदन 🌹
मनःपूर्वक अभिनंदन 🌹
नमस्कार सर आपले हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन भुजबळ सर