महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
– संपादन
महात्मा फुले थोर समाजसेवक ज्ञात
भेदाभेद टाळून समाज करती सज्ञान IIधृII
लाभले माता पिता चिमणाबाई गोविंद
जन्मले सुपुत्र कटगुण खेडेगावांत
बाल ज्योतिबांचे सुगुण दिसती उपजत II1II
बुद्धिमान हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात
मातृछत्र हरपले त्यांचे बालवयांत
स्वकर्तुत्वाने झाले सुशिक्षित अल्पावधीत II2II
सर्व अभ्यास पूर्ण केला पाच वर्षांत
सर्वांना शिक्षित करण्याचे स्वीकारले व्रत
दिन दुबळ्यांसाठी निर्मिती शाळा सहेत II3II
सावित्रीबाईंना केले शिक्षिका शिकवून
स्त्री शिक्षणाला दिले प्राधान्य कार्य महान
वेचले जीवन दोघांनी विरोध सोसून II4II
शेतकऱ्यांचे गरिबांचे कनवाळू प्रसिद्ध
सत्यशोधक समाज स्थापिला सन्मानार्थ
समाजाने महात्मा उपाधीनं केले सन्मानित II5II
शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहिले तिसरे रत्न
गुलामगिरी अस्पृश्यांची कैफियत ग्रंथ
सार्वजनिक सत्यधर्म निर्मिला थोर ग्रंथ II6II
विद्येविना मतिविना नीतिविना अनर्थ
गतिविना वित्तविना शिक्षणाविना व्यर्थ
शिक्षित केले समाजाला दिली शिकवण II7II
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800