विद्यार्थीदशेत कोणत्याही खेळाची आवड अतिशय महत्वपूर्ण असते. हल्ली सर्वच पालक अतिशय जागरूकपणे आपल्या पाल्याला यशस्वी खेळाडू पाहू इच्छितात. असे असले तरी आपल्या मुलांना जो क्रिडाप्रकार आवडतो त्यातील आनंद घेऊ द्या. जलतरण क्रीडाप्रकार शरीरासोबत मनालाही सक्षम करतो.” असे मत हॉकी लिजेंड ऑलिम्पियन पद्मश्री डॉ. धनराज पिल्ले ह्यांनी व्यक्त केले. ठाण्यातील विजेत्या जलतरणपटूंचे अभिनंदन करताना ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित 13 व्या राज्यस्तरीय खुल्या समुद्रिय जलतरण स्पर्धा नुकतीच मालवण येथे पार पडली. या जलतरण स्पर्धेत डी. पी. (धनराज पिल्ले) फाऊंडेशनच्या ठाण्यातील जलतरणपटूंनी विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत पारितोषिके पटकाविली. या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यासाठी हॉकी लिजेंड ऑलिम्पियन पद्मश्री डॉ. धनराज पिल्ले ह्यांनी रामचंद्र ठाकुर जलतरण तलाव, ठाणे येथे नुकतीच भेट दिली. त्यांच्या भेटीमुळे सर्व जलतरणपटूनचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “लहानपणापासून आपल्या मुलांना मनसोक्त खेळू द्या. पारितोषिक मिळो अथवा न मिळो पण प्रोत्साहन देणे कमी करू नका.”
13 व्या राज्यस्तरीय खुल्या समुद्रिय जलतरण 10 की.मी स्पर्धेत अथर्व पवार – 6 वा क्रमांक, श्रीकर परांजपे 7 वा क्रमांक, स्वरा सावंत – 6 वा क्रमांक आणि स्पेशल कॅटॅगरी मध्ये 1 की.मी. स्पर्धेत अर्जून शाली – 3 रा क्रमांक व करण नाईक – 5 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच मित गुप्ते, लौकिक पेडणेकर, अपूर्व पवार, सॅव्हिओला रोनाल्ड, गौरी नाखवा, रुद्र शिराळी, रोहन राणे, जयराज नाखवा, स्वरा हंजनकर, मल्हार देसाई, वंशिका अय्यर, अभिर साळसकर, अर्णव पाटील, मनोमय लिंगायत ह्या सर्व जलतरण स्पर्धकांनी यशस्वीपणे भाग घेतला. तसेच डी. पी. (धनराज पिल्ले) फाऊंडेशनच्या सचिव अर्जुन पुरस्कार विजेत्या आरती प्रधान, प्रशिक्षक नरेंद्र पवार व भारती सावंत यांनाही शुभेच्छा दिल्या.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800