अनलज्वाला (८+८+८)
तुला हवे तर मागे सरतो दोन पावले
जाळ तुझे पण जे गर्वाचे भाव दाटले
खाली जितके बघतो तितके बघ उंच तरी
तेंव्हा तारे कळतील तुला वर नभातले
ग पणा नडतो, बाधा जेंव्हा मनास होते
दिसतात खुजे पहाड डोंगर ही जगातले
जितके हसरे तितके फसवे राजकारणी
कळतच नाही कोण कोणत्या मग गटातले
दोस्ती बिस्ती नका करू पण हसून बोला
बस स्नेहाचे उधळा सारे रंग आतले
पाठीवरचा डाग दावतो अनोळखी पण
स्विकारण्यातच दडले आहे भले आपले
चुकलेल्याच्या मागे जाणे धोका असतो
डोळे उघडे ठेवा निवडा मार्ग चांगले
— रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800