संघर्षाने खूप दमवले
कधी हसवले कधी रडवले
काय म्हणावे व्यवहारांना
विश्वास जिथे तिथे फसवले
खुणा मोजक्या सापडल्या पण
नकाशातले गाव हरवले
हसता हसता गिळले अश्रू
आयुष्याने असे घडवले
हीच गझल आपण पुढील लिंक वर क्लिक करून ऐकू, बघू शकता….
स्वर :- श्री.संभाजी पाटील.
तबला संगत :- मा.श्री. दिगंत पाटील.
— गझलकारा : माधुरी मगर- काकडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800
खूप सुंदर