प्रेमात वाहणे बरे नाही
जीवास जाळणे बरे नाही..
प्रेमात कल्पना खुळी असते
स्वप्नात राहणे बरे नाही..
जुळवून घेतले नशीबाशी
कोणास सांगणे बरे नाही…
होते उरात राख रांगोळी
आगेत चालणे बरे नाही..
साधा निरोप देत जावा
कोणास टाळणे बरे नाही..
— रचना : सौ. दिपाली वझे, बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800