व्योमगंगा वृत्त
जीवनाच्या सांजवेळी
जीवनाला जाणताना,
मैफली त्या जागताना
भैरवीची वेळ झाली..
आस होती फार मोठी
बांध मोठा पोहण्याची,
पैलतीरी पोचताना
वादळाची वेळ झाली..
सृजनांच्या सोबतीने
मोट त्यांची बांधताना
साहसाने दोरखंड ते
सोडण्याची वेळ झाली..
जीवनाच्या रंगमंची
भूमिका त्या जागताना,
रोल ऐसा निभविला की
थांबण्याची वेळ झाली..
जीवनाचे खेळ सारे
धाडसाने खेळताना,
टॅास ऐसा खेळला की
हारण्याची वेळ झाली..
— रचना : डॉ मीना बर्दापूरकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800