गणपती बाप्पा गणपती बाप्पा
चल ना मारूया जरा गप्पा
तुझ्या आगमनाची चाहूल लागताच
सर्वांना होतो हर्ष.
चाकरमान्यांना घरी जाण्याचा
जणू आनंदाचा पर्व.
गल्ली गल्लीत
छोट्या नेत्यांना होंल्डीग
लावायचा भलताच गर्व
गणपती बाप्पा….. जरा गप्पा
“एक गाव एक गणपती”
टिळकांनी घातला,
संघटीत होण्याचा घाट.
आता एका गावात प्रत्येक गल्लीत
असतो तुझा थाटमाट
मिरवणुकीत डिजे, फटाक्यांनी
प्रदुषण करून धागडधिंगा नाच.
बघ सोडली कशी यांनी लाज.
गणपती बाप्पा… जरा गप्पा
दोन वेळेची आरती
आवर्जून करतात राव
भजन, कीर्तनाचा आणतात
नुसता आव
पण रात्री मंडपात
पत्त्यांचा मांडतात डाव
आणि मद्यावर मारतात ताव
गणपती बाप्पा… जरा गप्पा
मुर्ती च्या उंचीवर
नुसती असते चढाओढ
लहान मूर्ती मधे
नसतो का रे भाव.
अशी वागणूक पाहून
तुझ्या ही मनावर
पडत असतील ना रे घाव
गणपती बाप्पा……जरा गप्पा
गणपती बाप्पा तक्रार करत नाही
पण पहीलेसारखा भक्ती भाव,
या जगात नाही
काही लोकांमधे आहे अजूनही
नितळ भाव
बाकी करतात नुसता बडेजाव
आणि म्हणतात देवा मला पाव
गणपती बाप्पा….. जरा गप्पा
— रचना : सौ.शितल अहेर. खोपोली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Khup Sundar….
Khup chan aattya..
khup chhan