Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यगणित जीवनाचे

गणित जीवनाचे

आयुष्याची भूमिती,
साऱ्यानांच खेळायची
कोन, त्रिकोन सांधण्या, धडपड ही करायची || धृ ||

प्रयत्नांचा करता गुणाकार
वजाबाकी होते अहंतेची
सहज सुटेल मग प्रमेय
साठवण होई आनंदाची ..१
कोन, त्रिकोण सांधण्या, धडपड ही करायची || धृ ||

कोन, त्रिकोन, चौकोनांची
साथ नाही सोडायची
सीमात त्या, बध्द न होता
स्वच्छ, शुध्द दृष्टी ठेवायची..२
कोन, त्रिकोण सांधण्या, धडपड ही करायची || धृ ||

शून्यास दूर ठेवूनिया
आयुष्याची गणिते सोडवायची
जीवनमृत्युची पोकळी
संतोष, सत्कर्माने भरायची..३
कोन, त्रिकोण सांधण्या, धडपड ही करायची || धृ ||

— रचना : डॉ दक्षा पंडित.
सँनडिआगो, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

 1. दक्षा ताईंची गणीती दृष्टी
  सर्व ज्येष्ठांना उपयोगी पडायची
  आयुष्याचा वर्तुळात वावरताना
  खिशाच्या परीघात राहायची
  कोण त्रिकोण साधण्या धडपड करायची

  सुंदर सुरेख भुमितीक दृष्टीकोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments