आज, मार्गशीर्ष शुक्लपक्ष एकादशी अर्थात गीता जयंती आहे. त्यानिमित्ताने गीतेचे माहात्म्य वर्णन करणारी ही कविता. गीता जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
संभ्रमात सद्गदित पार्थाने
शस्त्र ठेविले समरी
कसे करावे शस्त्रसंधान
सारे आप्तजनच सामोरी
कर्म करणे हाच धर्म
नको आस फलप्राप्तीची
उपदेशिले श्रीकृष्णाने, तयाच्या
वचनांतून निर्मिती गीतेची
नको द्वेष नको ईर्ष्या
अपुल्या वाटेचं कर्म करावे
परमात्म्यावर ठेवूनी श्रद्धा
योगशक्तीचे तत्व जाणावे
अहंकार घडवी विनाश म्हणुनची त्यागावा सत्वर
कुणी असो वा नसो सोबती
साथीदार असे सदैव ईश्वर
सत्याची कास धरता
सत्व लागेल पणाला
संयमाने अनुसर धर्माला
माझ्यातच जाशील सामावला
अविनाशी ज्ञानाची महती
कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग सांगती
अशी भगवद्गीता अमुची संस्कृती
तिची आज ५१६१ वी जयंती
पठण करूया गीतेचे
मनन करूया ज्ञानाचे
निश्चितपणे होतील सफल
प्रयत्न आत्मशोधाचे !
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दु:खभाग् भवेत्।।
ॐ शान्ति: शान्तिः शान्तिः॥

— रचना : नीला बर्वे, सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वाह…! सुंदर..!
Neelatai tumhi thodkyat Geeteche saar ya kavitetun sunder vyakta kelet. Thank you dear!❤️🙏
खुपच छान