गौतमा तू निघालास
माया, मोह राजपद सोडून
दुःखाच्या शोधात
बोधीवृक्षाखाली ज्ञान शोधाया ||१||
दया, क्षमा, शांती, अपरिग्रह देवूनी
दिली मानवता पंचशीलांनी
देवता, पुर्नरजन्म, चार वर्णास दिली आहुती
जमवले भिक्कू गावा गावा मधुनी ||२||
जातक कथांचा पालीतून दिला बोध
पुत्र, पुत्रीस धाडले धर्म प्रसारार्थ
“बुध्दम् शरणम् गच्छामी” मंत्र
केलास राजाला, शूद्रांना अर्पण ||३||
राजा अशोक रणभूमी वरूनी
निघाला शांतीच्या शोधात
तुझ्या तत्वांचा झाला विजय
आज तारेल सर्व जगास ||४||
युध्दाने जग ना तरले, सरले
शांतीसाठी तुला अनीसरले
“बुध्दम् शरणम् गच्छामी”
युगानुयुगे युगानुयुगे ||५||
— रचना : डॉ अंजली सामंत, न्यूयाॅर्क
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800