Wednesday, September 17, 2025
Homeबातम्याग्रा.मु.म.सा. : वर्धापन दिन उत्साहात साजरा

ग्रा.मु.म.सा. : वर्धापन दिन उत्साहात साजरा

मराठी साहित्य समृध्द करण्यासाठी मराठी साहित्यात अनेक साहित्य प्रवाह निर्माण झाले. या प्रवाहांनी मराठी साहित्यात सातत्याने चैतन्य निर्माण केले. त्यात दखलपात्र व महत्वाचा वैश्विक साहित्य प्रवाह म्हणून मुस्लिम मराठी साहित्य या प्रवाहाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मानवी जीवनातील क्षुद्रता, अपुरेपणा, व असंतोष यांचे निराकरण करून ते उन्नत व सुखी करण्याचे महत्कार्य साहित्याकडून होत असते. या साहित्यद्वारा भारतातील सर्वधर्मीय नागरीकात उच्च विचारसरणी, व्यापक दृष्टी व समाधान निर्माण करणे हे महत्वाचे कार्य आहे. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बोल्डा, ता. कळमनुरी येथील ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य ही संस्था सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करत असते.

एक मे हा संस्थेचा वर्धापन दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून १५ मे रोजी लातुर येथील सुप्रसिध्द कवयित्री तहेसीन मसूद अली सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन दमदार व वैचारिक कवितांच्या सादरीकरणाने यशस्वी ठरले.

या कवीसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द कवयित्री नेहा गोडघाटे (माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांच्या परिवारातील सदस्य) यांनी केले.

कविसंमेलनात मिनाज शेख, पुणे; शाहिदा शेख; बबन मोरे; सुरज खेडकर, अहमद पिरनसाहब शेख, वसमत; आर आर पठाण, वाशिम; श्रीरंग थोरात, वसमत; सुमित हजारे, नसीम जमादार, कोल्हापूर; वाय.के.शेख पारगाव, वाघमारे धम्मोदय नांदेड; पांडुरंग कोकुलवार, नांदेड; मो.अ.रहीम चंद्रपूर; गौसपाशा शेख, सारिका देशमुख या निमंत्रित कवींनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष हाशम इस्माईल पटेल, विश्वस्त जाफरसाहाब चिखलीकर, खाजाभाई बागवान, डाॅ. सय्यद जब्बार पटेल, अनिसा सिकंदर शेख, इस्माईल शेख, महंमद रफी, महासेन प्रधान यांनी पुढाकार घेतला.

कवीसंमेलनाचे सूत्रसंचलन कवी शेख शफी बोल्डेकर यांनी केले. तर आभार शेख जे. आर. यांनी मानले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आमच्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या तिस-या वर्धापन दिनाची बातमी प्रसिध्द केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं