Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….सदरात आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आपण मागच्या आठवड्यापासून “संगती रंग” हे लेखिका वसुंधरा घाणेकर यांचे व्यक्तिचित्रण पर सदर सुरू केले आहे. विशेष म्हणजे या सदराच्या पहिल्याच भागाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला आहे, या बद्दल वसुंधरा घाणेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्व वाचकांना धन्यवाद.

आता पाहू या गेल्या आठवडय़ात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

1
उत्कृष्ट अभियंता म्हणून ओळखल्या गेलेल्या श्री.अमोल मोहोळकर यांना आमच्या सर्वांच्या वतीने मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला अभिमान वाटावा अशा उत्कृष्ट कामगिरीची ही यशस्वी वाटचाल अशीच कायम चालू राहूदे 💐🙏
— शर्मिला मनोज. अमेरिका
2
जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी माझे एक नेहमीचे पेशंट त्यांच्या काही किरकोळ तक्रारींसाठी माझ्याकडे आले होते आणि नंतर मग त्यांच्या बऱ्याच कंप्लेंट पुढे आल्या… त्यांच्या इन्वेस्टीगेशन करून आणि त्यांना औषध देऊन ते बरे झाले. त्यांचं निदान होतं “पुरुषांचा मेनोपॉज” यावर मी केस प्रेझेंट केली होती. आमच्या आयुर्वेदाच्या एका मासिकात यावर लिहिले होते. पुरुषांनासुद्धा मेनोपॉज होतो हा विचारच तेव्हा पचण्यासाठी जड होता. आजही याबद्दल जागृती होणं आवश्यक आहे. यामध्ये भाग घेतलेल्या डॉक्टर वैशाली लोढा; पुण्याच्या त्या माझी चांगली मैत्रीण आहेत. खूपच कौतुकास्पद..
जेव्हा स्त्रियांना मेनोपॉजचा त्रास होतो तेव्हा त्याचा प्रभाव सगळ्या घरावर पडतो. त्याचप्रमाणे पुरुषांचा मेनोपॉज सगळ्या कुटुंबाला त्रासदायक ठरू शकतो. पण याचं निदानच होत नाही..
— डॉ अरुणा टिळक.
3
पुरूष मेनोपॉज अशा संवेदनशील पण सामाजिक दृष्टीकोनातून महत्वपूर्ण विषयावर आयोजित चर्चेचे महत्व अनन्यसाधारण आहे.
— प्रा.डॉ सतीश शिरसाठ. पुणे
4
🙏🙏🎥📹🌹🌹👌👌
देवेंद्र जी
आधार रेखा प्रतिष्ठान बद्दल खूप छान माहिती मिळाली. कॅन्सर‌ नांव ऐकलं की अंगातील सर्व शक्ती निघून जाते.भीती वाटते.
हलकं फुलकं
बजेट बिजेट
खूप छान विडंबन लेख आहे.
नवीन सूरू होतं असलेले संगती रंग खूप छान मेजवानी आहे.
— नरसिंग पोतकंठी. निवृत्त दूरदर्शन कॅमेरामन, मुंबई.

5
वसुंधरा घाणेकर लिखित आरसे महाल छान आहे. अशा बऱ्याच व्यक्ती खरोखर असतात.स्वतः च्याच प्रेमात पडलेल्या ! त्यांना कोणीतरी आरसा दाखविण्याची गरज असते.. सध्या डिजिटल स्पर्धा, त्यात मिळणारे सर्टिफिकेट आणि त्या प्रशंसा पत्रांच्या जोरावर स्वतः ला गायिका किंवा श्रेष्ठ लेखिका समजणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांना हा लेख आवर्जून पाठवावा असा आहे. धन्यवाद वसुंधराताई. मुलाने पाठवलेले चित्र ही उत्तम.

स्त्रियांनी आयोजिलेला परिसंवाद ही गरजेचाच आहे …छान
मोमोज करते मी… कधीकधी …त्यामुळे स्नेहाताईंची रेसिपी पडताळून बघितली..थोडी वेगळी वाटली…करून बघायला पाहिजे
श्रद्धा यांची संध्याकाळ मनास स्पर्शून गेली.आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई.
6
नमस्कार सर,
वसुंधरा घाणेकर यांच्या ‘संगती रंग’ या लेखमालेतील पहिलाच अतिशय छान असा लेख ‘आरसेमहाल’ वाचला. खरंच अशा अनेक आत्ममग्न व्यक्ती आपल्या आसपास असतात. माझी एक मैत्रीण फक्त स्वतः, कुटुंबीय आणि स्वतःच्या झालेल्या कौतुकाबद्दलच बोलत असते. एखादा वेगळा विषय कधी निघालाच तर ‘भरपूर कामे आहेत, निघते गं मी!’ असे म्हणून निघून जाते. वसुंधराताईनी खूप सुंदर स्वभावविशेष विशद केला आहे.

पुरुषांनाही ‘मेनोपाॅज’ असतो हे “स्त्रियांनी आयोजिला पुरुष मेनोपॉज” या परिसंवाद माहितीमुळे प्रथमच समजले.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 2
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2