Saturday, April 20, 2024
Homeबातम्याघरेलू कामगारांसाठी मिलेनियम टॉवर्स येथे सेवा शिबिर संपन्न

घरेलू कामगारांसाठी मिलेनियम टॉवर्स येथे सेवा शिबिर संपन्न

सूर्योदय फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स च्या संयुक्त विद्यमाने मिलेनियम टॉवर्स, सानपाडा येथे घरेलु कामगार (घरकाम करणाऱ्या) आणि कमी उत्पन्नगटासाठी स्री /पुरुष यांच्या साठी नुकतेच सलग ३ दिवस आर्थिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सेवा शिबिरामध्ये २७० कामगारांनी रजिस्ट्रेशन केले. मिलेनियम टॉवर्स, सानपाडा चे कमिटी मेंबर श्री श्रीकांत जोशी, श्री विश्वनाथ सावंत आणि लायन्स क्लब च्या प्रेसिडेंट अलका भुजबळ यांच्या पुढाकाराने हे सेवा शिबिर आयोजित केले होते. शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

घरकाम करणाऱ्या महिला रोज 8/10 घरी काम करतात. त्यांच्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. जेणेकरून, त्यांच्या धकाधकीच्या जीवनात, त्यांच्या उतारवयात त्यांना या योजनांचा फायदा होईल. तसेच त्यांना आणि त्यांच्या परिवाराला वैद्यकीय सुविधांचा सुद्धा मोफत लाभ मिळेल, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. बचतीचे महत्त्वही पटवून देण्यात आले.

या शिबिरामध्ये आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, घरेलु कामगार कार्ड, आधार- मोबाईल लिंक करणे, बँकेत नविन अकाऊंट उघडणे आणि बँकेच्या सरकारी योजनांची माहिती देणे, तसेच इतर सरकारी योजनेची त्यांना माहिती सांगणे. या सर्वाचा समावेश होता.

या सर्व सरकारी योजनांची माहिती समजावून दिल्यामुळे व बँक खाते (झिरो बेलेन्स) उघडुन मिळाल्याने त्यांचा खुप फायदा झाला व त्यांनी या आर्थिक प्रशिक्षण शिबिराला ला चांगला प्रतिसाद दिला. मुख्य म्हणजे सर्वांना मराठी, हिंदी भाषेत, या घरकाम करणाऱ्या बायकांना सोप्या शब्दात समजेपर्यंत अगदी उदाहरण देऊन सूर्योदय फाउंडेशन च्या स्टाफ ने न थकता सर्व माहिती सांगितली. या महिला कामगारांच्या घरची मंडळीनां सुद्धा या योजनांची माहिती दिली.

या 3 दिवसात २७० जणांचे रजिस्ट्रेशन झाले. ६२ जणांनी KYC केले (आधारकार्ड लिंक to मोबाईल), त्यातील २ जणींनी सन्मान योजनेचा लाभ घेतला. ३५ जणांना आभा कार्ड मिळाले. १८ जणांना ई-श्रम कार्ड मिळाले. ४७ जणांनी बँकेत नवीन अकाऊंट चालू केले, तर १८ जणांनी कमीतकमी 500/- रू ची RD चालू केली आणि २४ जणांनी बँकेच्या सरकारी योजनांचा लाभ घेतला. काहींनी घरेलु कामगाराची कागदपत्रे त्यांच्या कडे जमा केली.
राहिलेल्या कामगारांचा कागदपत्रांचा पाठपुरावा सूर्योदय फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे.

टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. घरकाम करणा-या महिला या असंघटित कामगार असतात. शासनाकडून अनेक योजना असूनही त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाहीत. त्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ