Welcome to NewsStoryToday   Click to listen highlighted text! Welcome to NewsStoryToday
Thursday, July 17, 2025
Homeसाहित्यचला उठा मतदारांनो

चला उठा मतदारांनो

चला उठा मतदारांनो
करू हक्काचे मतदान
जागे होऊ सारे मिळून
निवडू उमेदवार छान

तरूण तडफदार ज्यांचे
असेल सदा व्यक्तीमत्व
कार्यरत असतील नित्य
त्यांचे पटणार ना तत्व!

चार दिवस सुटी येते
नका काढू कुठे पळ
हक्क गाजवा आपला
नेता शोभावा प्रबळ

कशाला हवे चार पैसे
फुकात नको विचार
ठाम असावे स्वमनाने
होऊ नका रे लाचार

उन्मत्त तरूण सुस्वभावी
नेता असावा मस्त राकट
माता भगिनी रक्षणकर्ता
नका आणू कोणी हलकट

देशसेवा तरूणास काम
कंपनीची करो भरभराट
कशाला हवे विदेशागमन
धाव घेणार जो सुसाट

केवळ खाणे ऐशोआराम
कळकटलेली नको मती
कृषकास आधुनिक ज्ञान
सर्व क्षेत्रात गाठो प्रगती

केवळ आम्ही अती विद्वान
करती दीनांची दाणादाण
सर्व क्षेत्री नेत्र असो तयांचे
माता बंधू एक समान

जल योजना,भविष्य जाणी
पंचवार्षिक योजना नवी
वेस्ट मधून बेस्ट करणे
योजकात सुबत्ता हवी

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सामाजिक भान देणारी कविता! मनापासून आवडली शोभाताई🌷

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Click to listen highlighted text!