नेहमीच राया तुमची घाई..
नका जाऊ शेतात…. रा बाया हो..
नका जाऊ शेतात रा बाया हो…
चला आता मतदान कराया
चला आता मतदान कराया.. हो
दादा वहिनी, बाबा गेले हो पर गावा..
निरोप त्यांना द्यायला हवा..
मतदान करायला लवकर या हो
मतदान करायला लवकर या..
सांगा सांगा तुमचं असं हो हो कसं..
तुमच्या भावा सांगा..
सांगा… तुमच्या बाबा सांगा…
साऱ्या गावा सांगा सांगा…
मतदान करायला विसरू नका
असं हो कसं तुमचं असं मतदान कार्ड
न विसरता घ्यावं आधार कार्ड सोबत ठेवावं..
20 एक नोव्हेंबर 2024 तारीख तुम्ही लक्षात ठेवावं..
मतदानाला सर्वांनी मतदान केंद्रावर जायला हवं….
दानाचा हक्क तुमचा आमचा
मतदानाचा हक्क तुमचा आमचा..
वायाला जाऊ देऊ नका हो…
वायाला जाऊ देऊ नका… हो..
सरकार चांगलं बनवायचं हो..
सरकार चांगलं बनवायचं
सरकार चांगलं बनवायचं !!
— रचना : शांतीलाल ननावरे. बारामती
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800