Saturday, December 21, 2024
Homeकलाचित्रसफर : ३३

चित्रसफर : ३३

“मधुबाला ते माधुरी”

कुठलीही संस्था म्हणजे केवळ इमारत आणि इमारतीतील कर्मचारी वर्ग नव्हे, तर ज्या उद्देशाने संस्था स्थापन करण्यात आली आहे, वाढवण्यात आली आहे. त्या उद्देशांशी किती बांधिलकी ठेऊन ती प्रत्यक्ष कार्य करीत असते, हे महत्वाचे. अशीच एक सळसळती, जिवंत संस्था म्हणजे नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कुती मंडळ आणि या मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाषराव कुळकर्णी होत.

या संस्थेत काही कार्यक्रम शुल्क आकारून केले जातात. तर काही अक्षरशः निःशुल्क असतात. असाच एक निःशुल्क पण अतिशय कल्पक, निर्भेळ, दर्जेदार करमणूक करणारा कार्यक्रम नुकताच साहित्य मंदिराच्या सभागृहात पाहायला मिळाला आणि संपूच नये असे वाटणारा कार्यक्रम दीड तासातच आटोपल्याने प्रेक्षक चुटपुटतच घरी गेले.

असा हा बहारदार कार्यक्रम म्हणजे ठाणे येथील ‘सेव्हन स्टार गृप‘ प्रस्तुत “मधुबाला ते माधुरी” हा होय. “प्रेम” ह्या संकल्पनेवर आधारित, हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मधुबाला पासून माधुरी पर्यंतच्या तारकांचे प्रेमाविष्कार नृत्यातून सादर करण्याचं शिवधनुष्य, सेव्हन स्टार्सच्या ४ नृत्यांगनांनी अगदी लिलया पेलल्याचं जाणवत होतं. त्यांची अदाकारी आणि मुद्राभिनय लाजवाब !
विशेषतः कोरियोग्राफर तथा स्वतः नृत्यांगना असलेल्या चतुरा चिटणीस मोता यांची अदाकारी आणि मुद्राभिनय तर त्यांच्या वरील नजर हटू न देणारा ठरला. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केलेच पाहिजे.

तसंच अवघ्या ७७ वर्षे वयोमान असलेल्या या संस्थेच्या प्रमुख सौ. अलकाताई वढावकर ह्यांनी आपल्या ओघवत्या आणि खुसखुशीत निवेदनातून हा कार्यक्रम फुलवीत नेलाच पण सर्व उपस्थितांना त्यांचे वय विसरायला लावून प्रसंगी गीत आणि नृत्या सोबत ताल धरायला लावला. हिंदी चित्रपट सृष्टीतील तारकांचा प्रवास अतिशय रंजकपणे त्यांनी उलगडून दाखवला.

मोंघले आझम, मधुमती, अनाडी, चोरी चोरी, कालापानी, नवरंग, गाईड, शोले, कश्मीरकी कली, कांरवां, नटवरलाल इ. अनेक जुन्या नव्या चित्रपटांची ही सफर खरंच अनोखी होती. सरते शेवटी धकधक गर्ल माधुरी हिच्या सदाबहार गाण्यांवरील नृत्याविष्कार म्हणजे तर क्लायमॅक्स !

सव्वा तास रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. टाळ्यांचा कडकडाट आणि once more ने अवघं प्रेक्षागृह दणाणून गेले होते.

सेव्हन स्टार्सच्या चार स्टार, नृत्यांगना म्हणजे रेखा वढावरकर, श्वेता नाचणे, रश्मी चित्रे आणि चतुरा चिटणीस मोता या होत.
त्यांच्या रूपाने जणू हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध तारका मंचावर अवतरल्या होत्या. अप्रतिम कोरीओग्राफी आणि ४ जणींची कलालीची मेहनत दिसून येत होती

संकल्पना, लेखन, निवेदन सौ. अलका वढावकर यांचे असलेला हा कार्यक्रम पाहून एक दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळाल्याचं समाधान निश्चितच वाटलं.

ठाणे येथे झालेल्या या कार्यक्रमाची झलक आणि वाशी येथील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

असा हा कार्यक्रम आपण आवर्जून बघावा असा माझा प्रेमाचा आग्रह आहे.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.

— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. मधुबाला आणि माधुरी दीक्षित या हिंदी चित्रपट सृष्टीतील अत्त्युच्च तारका.त्यांच्या कार्याचा उचित आढावा घेतला आहे.

  2. ज्योती टिपणीस. (लेखिका,दिग्दर्शिका,अभिनेत्री, निवेदिका) ज्योती टिपणीस. (लेखिका,दिग्दर्शिका,अभिनेत्री, निवेदिका)

    सेव्हन स्टार्स ग्रुपचा हा कार्यक्रम पाहणं म्हणजे आपल्या जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणं. चिरतरुण अलकाताई नी प्रेक्षकांची नस बरोबर ओळखली आहे. आपल्या आवडत्या चित्रतारकेबरोबर त्या काळात अलकाताई आपल्याला घेऊन जातात आणि सुरू होतो एक लोभसवाणा प्रवास. आपण मंत्रमुग्ध होऊन पाहात राहतो या कलाकारांचा अप्रतिम नृत्याविष्कार. आपल्या नकळत पाय थिरकू लागतात , आपण गाण्यांबरोबर गुणगुणू लागतो तोच कार्यक्रम संपतो आणि मनाला चुटपुट लागते की इतक्यात कार्यक्रम संपलासुद्धा! मी सर्वांना आवाहन करते की असा हा उत्तम कार्यक्रम आपण चुकवू नका.

  3. एक नृत्यांगना म्हणून मधुबाला ते माधुरी..या कार्यक्रमाची प्रतिक्रिया देताना मनात ती गाणी आणि सेव्हन स्टार च्या नृत्यांगना सख्या सौ. श्वेता नाचणे, सौ. रेखा वढावकर, सौ. रश्मी चित्रे आणि सौ. चतुरा चिटणीस मोठा यांची नृत्ये रुंजी घालत आहेत. सर्व साहित्य प्रकारात लिलया वावरणाऱ्या साहित्यिका, निवेदिका सौ. अलका वढावकर यांची संकल्पना. त्या संकल्पनेला मूर्त रूप देणारे त्यांचे खुमासदार निवेदन चतुराने दिग्दर्शीत केलेली आणि सर्व नृत्यांगनांनी सादर केलेली देखणी भाव संपूर्ण नृत्ये, याचे वर्णन शब्दांत केवळ अशक्य आहे. ह्या सुंदर कार्यक्रमाचा तितकाच सुंदर दृश्य आणि शब्दानुभव व्हिडिओ तथा देणे, हे संपादकांचे कौशल्य आहे. सर्व रसिकांनी ह्या कार्यक्रमाचा अनुभव नक्की घ्यावा

  4. मधुबाला ते माधुरी ह्या कार्यक्रमाचं बारकाईने निरीक्षण करुन श्री देवेंद्र भुजबळांनी अतिशय सुंदर परिक्षण केले आहे. जे वाचल्यावर हा कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. सेव्हन स्टार्स ठाणे गृपचा गोष्ट एका लग्नाची हा कार्यक्रम देखील असाच प्रेक्षणीय आहे.
    आशा दोंदे

  5. आजच्या जेष्ठ नागरिकांचे तरुणपणातील क्रश मधुबाला व उतारवयातील चैतन्य माधुरी यांची सुखद आठवण म्हणजे अलकाताई वढावकर यांचे मधुबाला ते माधुरी हा कार्यक्रम. अलकाताई यांचे ओघवते निवेदन त्याला चतुराचे कमालीचे नृत्य दिग्दर्शन व सर्वांची बहारदार अदाकारी ,आम्हाला आमच्या दिवसात घेऊन गेली. सेवन स्टार खुप खुप धन्यावाद व खुप शुभेछा

  6. *मधुबाला ते माधुरी* सुंदर शब्दांकन!
    या लेखामुळे कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा जागृत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments