राणी एलिझाबेथ
ब्रिटनच्या इतिहासात प्रदीर्घ काळ सम्राज्ञी राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची पहिली भारत भेट सन १९६१ साली झाली होती. या भेटीत त्यांनी मुंबईला देखील भेट दिली होती.
आपल्या मुंबई भेटीत राणीचा मुक्काम राजभवन येथे होता. दि. २३ ते २५ फेब्रुवारी १९६१ या तीन दिवसांच्या भेटीत झालेल्या एलिझाबेथ यांच्या मुंबईतील विविध कार्यक्रमांची माहिती, राणी एलिझाबेथ यांच्या मुंबई भेटीवर आधारित
माहितीपटात देण्यात आली आहे.
‘राजभवन हेरिटेज वॉक’ मालिकेअंतर्गत राजभवनाच्या जनसंपर्क शाखेने हा माहितीपट तयार केला आहे.
या माहिती पटाची श्रेय नामावली पुढील प्रमाणे आहे….
पटकथा, संशोधन, निवेदन व उपशीर्षके – उमेश काशीकर
संकलन – नागोराव रोडेवा
संगीत संयोजन – अक्षय कुबल
स्थिर चित्रण – फिल्म डिव्हिजन (राकेश गायकवाड)
छायाचित्रे – पद्मश्री सुधारक ओलवे, प्रतीक चोरगे, वैभव नडगावकर
फोटो डिव्हिजन, भारत सरकार
ग्राफिक डिझायनर – निधी बोलार, प्रा. शुभानंद जोग
आभार – श्री सुजित उगले. संचालक, पुराभिलेख संचालनालय
विकिपेडिया, श्री संकेत कुलकर्णी. लंडन
रमेश पाटील, धिरज पेडेकर, हृषिकेश परदेशी
राजभवनातील अधिकारी व कर्मचारी
प्रस्तुती – जनसंपर्क शाखा, राजभवन, मुंबई
pro.rb-mh@nic.in
हा माहितीपट आपण पुढील 👇लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
खरं म्हणजे, प्रसार माध्यमांशी संबंधित कामकाज हे आता अक्षरशः २४ तास आणि ३६५ दिवस असे झाले आहे. असे असताना स्वतःची दैनंदिन कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे पार पाडत इतक्या उत्कृष्ट, संग्राह्य, ऐहातिसिक मूल्य असलेल्या माहितीपटाची निर्मिती केल्या बद्दल राजभवनाची जनसंपर्क शाखा निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.
त्यांच्या कडून असेच भरीव योगदान पुढेही मिळत राहो, यासाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ब्रिटनच्या सम्राज्ञी एलिझाबेथ (२) यांच्या मुंबई भेटीत, राजभवन जनसंपर्क विभागाने केलेला माहितीपट माहितीपूर्ण तसेच मनोरंजक.