आज जागतिक चिमणीदिन आहे. या निमित्ताने वाचू या ही कविता.
— संपादक
माझ्या बाभुळबनात
एक चुकलं पाखरू,
सैरभैर वा-यावर,
वाट हुकलं पाखरू
काट्याकुट्याच्या रानात
फूल शोधीतं पाखरू,
आभाळाच्या फांदीवर,
घर बांधीतं पाखरू
होता सांजवेळ दाट
सैरभैरलं पाखरू,
सरे उजेडाची वाट,
मागं उरलं पाखरू
मुक्या पाखरू पणाची
जात टाकतं पाखरू,
पहा-यात पारध्यांच्या,
कात टाकतं पाखरू
एका श्रावणसरीची
वाट पहातं पाखरू,
पुन्हा होईल पहाट,
जागं रहातं पाखरू
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800