Saturday, September 14, 2024
Homeसाहित्यजर तू नसतीस तर

जर तू नसतीस तर

आई तू नसतीस तर
नसता मिळाला जन्म
नसते मिळाले संस्कार
नसती मिळाली प्रेरणा ||१||

संकटावर मात करून
जगण्याची चिकाटी
तू पायांच्या भेगा झेलत
दिली मुठीत स्वप्न ||२||

केलेस हात मोकळे
मनात पेरलास स्वाभिमान
ताठ कणा शिक्षणाने
विद्यापीठाचा किल्ला सर करून ||३||

भरली तुझी ओटी
केली तुझी सारी स्वप्न
अंगणात झोपताना
दाखवले अनंत तारे ||४||

पार केले देश परदेश सारे
अढळ पदावर जाणारे
मार्ग तुच प्रकाशमय केलेस
तू नसतीस तर नसते अस्तित्व ||५||

डॉ अंजली सामंत

— रचना : डॉ अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments