Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यजीवनगाणे गातच रहावे

जीवनगाणे गातच रहावे

आनंदाची फुले फुलवुनी ।
या जगताला हसवत जावे ।।
दुःख भोग ते विसरून सारे ।
जीवनगाणे गातच जावे ।।

कोण कुणाचा कधी सोबती ?
प्रवास तरीही सुखे संगती ।।
दोन जीवांचे क्षणिक मिलन ।
कोण जाहला अमर शेवटी ?

करुनी आनंदीत जगाला ।
जीवनगाणे गातच जावे ll
आयुष्याचे करुनी सार्थक ।
मानवतेला जपत रहावे ।।

जन्म मरण ते देवाहाती ।
लोभ कशाला चित्ती असावा ?
आनंदाचे क्षण क्षण वेचूनी ।
दिवस साजरा, गोड करावा ।।

झाले गेले विसरून जावे ।
नवीन गाणे मुखी असावे ।।
पराधीनता जाणून घ्यावी ।
जीवनगाणे गातच जावे ll
जीवन गाणे गातच जावे
दुःख सारे विसरून जावे

प्रतिभा पिटके.

— रचना : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ