शोधिते मी मलाच पुन्हा
आणि मज भेटे ईश्वर
आत्मानंदी गमक पान्हा
होई मजला साक्षात्कार
वाटे मज जावे वनात
कळे आत्मज्ञान गमक
मूर्तिमंत हरी मनात
साऱ्या विश्वाचा जो जनक
नुरे आस ती अधिकाची
देऊन मोहाची आहुती
जोड अशी ही अध्यात्माची
वासना ती नुरे मागुती
देही वसे तो आत्माराम
जीवन जगावे धुंदीत
जपावा घोष रामनाम
रमावे सदा स्वानंदात
— रचना : आशारेखा. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
