Friday, December 6, 2024
Homeकलाटाकाऊतून टिकाऊ - १

टाकाऊतून टिकाऊ – १

आक्रोडाच्या बाहुल्या

बरेचदा आपण बऱ्याच वस्तू निरुपयोगी म्हणून टाकून देतो. खरं म्हणजे थोडी कल्पकता वापरली तर या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्माण होऊ शकतात. शिवाय आपला वेळ छान जाऊन छंद ही जोपासता येऊ शकतो. हे विचारात घेऊन आपण आज पासून दर गुरुवारी “टाकाऊतून टिकाऊ” हे सदर प्रसिध्द करीत आहोत.

हे सदर नांदेड निवासी सौ. अरुणा गर्जे या लिहिणार आहेत. त्या एम. ए. समाजशास्त्र असून विविध माध्यमातून विविध प्रकारचे लेखन करीत असतात. त्यांचा ‘छोट्या दोस्तांसाठी काय पण !’ हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे.

टाकाऊतून टिकाऊ कलानिर्मिती हा छंद त्यांनी जोपासला असून इतरांना मार्गदर्शन करण्यासाची आवड आहे.

आपल्या न्युज स्टोरी टुडे परिवारात सौ अरुणा गर्जे यांचे मनःपुर्वक स्वागत आहे.
– संपादक

आपण अक्रोड, बदाम, काजू अशा प्रकारचा सुकामेवा बरेचदा खातो. अक्रोडच्या आतील मगज खाल्यानंतर त्यावरील टरफले निरुपयोगी म्हणून फेकून देतो. पण अक्रोड फोडतांना कसेही न फोडता सलग दोन भाग होतील असे व्यवस्थित फोडले तर टरफलांचे सुंदर बाहुला बाहुली आपल्याला तयार करता येतील.

अक्रोड घेतानाच शक्यतो मोठ्या आकाराचे घ्या. त्याच्या आतील मगज काढून घेतल्यानंतर ती फेव्हीकॉलने पूर्ववत चिकटून घ्यावीत म्हणजे ती पूर्वीप्रमाणे गोलाकार दिसतील. आपल्याला बाहुला बाहुली तयार करण्यास एकूण सहा अक्रोड लागतील.

फोटोतल्या प्रमाणे एकावर एक चिकटवून नंतर खाली अर्धे अक्रोड उपडे ठेवून त्यावर चिकटवावीत.अर्धे अक्रोड बाहुलीच्या डोक्यावर टोपलीप्रमाणे ठेवून त्यात जाड कागदाच्या मासोळ्या किंवा रंगीबेरंगी फळेही आपण ठेवू शकतो. नंतर अर्धे अक्रोड बाहुल्याच्या डोक्यावर फेट्याप्रमाणे ठेवावे. आता आपले बाहुला बाहुली पूर्णपणे तयार होतील.

यावर ऑईलपेंटने सुंदर रंगरंगोटी करावी. अशी टाकाउतून टिकाऊ कलाकृती करायला अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय आकर्षक आपणास नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.

अरूणा गर्जे

— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. अभिनंदन अरुणा जी खूपच आकर्षक बाहुल्या निर्माण केल्यात. तूमच्या कलादृष्टीचे व निर्मिती कौशल्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

  2. अक्रोडापासून तयार केलेल्या सुंदर बाहुल्या खुपच आवडल्या.

  3. खूपच छान सदर. एका आठवड्यात एक ह्याप्रमाणे कलाकृती करून पण बघता येतील तसेच वस्तुंचा अपव्यय ही होणार नाही.

  4. अक्रोडाच्या बाहुल्या खुपच सुंदर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !