Saturday, July 27, 2024
Homeकलाटाकाऊतून टिकाऊ - ४

टाकाऊतून टिकाऊ – ४

सॅंड पेपरची फुलपाखरे

फुलाफुलांवरून उडणारी फुलपाखरे अगदी लहानपणापासूनच आपण पहात आलो आहोत. त्यांचे ते आकर्षक रंगरूप पाहून पकडून घरात ठेवण्याचा मोह होणे साहजिकच आहे. पण हे जरी शक्य नसले तरी अगदी जीवंतपणाचा आभास निर्माण करणारी फुलपाखरे आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो. पण यासाठी सँडपेपर मात्र आपल्याला विकत आणायचा आहे.

या फुलपाखरांसाठी काळ्या रंगाचा सँडपेपर घेऊन फुलपाखरांच्या पंखांचा आकार मागच्या बाजूने काढून घेऊन, त्या आकाराने पंख कापून घ्यावेत. पंखांवर विविध रंगाचे सुंदर असे डिझाईन काढून ऑईल पेंटने रंगवावे.

फुलपाखरांचा मधला अळीप्रमाणे दिसणारा भाग तयार करण्यासाठी कुठलाही मऊ असा साबण घ्यावा म्हणजे त्याला ओल्या मातीप्रमाणे आकार देता येईल. त्यावर खोल आडव्या रेषा कोरून काढून रंगाने रंगवाव्यात. डोळ्याच्या ठिकाणी बारीक काळे मणी लावावेत. बारीक तार किंवा काळी वायर लांब मिशाप्रमाणे लावावी. भिंतीवर अडकविता यावे म्हणून बारीक तारेचेच हुक तयार करावे.

आता हे सर्व केल्यानंतर आपण जे पंख तयार केले होते ते दोन्ही बाजूला अगदी सावकाश खोचून बसवावे. साबण नरम असल्याने हे करणे फार सोपे जाते.
याप्रकारे दोन ते चार फुलपाखरे तयार करून भिंतीवर लावल्यास फारच सुंदर दिसतात. करायला अगदी सोपी आणि जिवंतपणाचा आभास निर्माण करणारी फुलपाखरे आपणास करायला आणि बघायला नक्कीच आवडतील.

— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments