ज्ञानमंदिर, कल्याण (पू)च्या प्रांगणात वार्षिक सेन्हसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वार्षिक पारितोषिक सोहळ्यास जेष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्री अशोकजी बागवे व न्युज स्टोरी टुडे या वेबपोर्टल चे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ, तसेच छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी एकनाथ गागरे व पर्यवेक्षक श्री रमाकांत पाटील उपस्थित होते.
शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात काळानुसार अनेक बदल होताना दिसतात. हे बदलाचे वारे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी घेऊन येतात. असे असले तरी शाळांमधील पारंपारिक स्नेहसंमेलनाचा गोडवा काहीसा हरवल्याचा सूर ऐकू येतो. परंतु नूतन ज्ञान मंदिर मध्ये हा सूर आणि गोडवा आजतागायत असाच कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न या वार्षिक स्नेहसंमेलनात गेली कित्येक वर्ष करत आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचा जणू या शाळेने विडाच उचललेला आहे. बाल नाट्य, पथनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, नवीन व जुन्या गाण्यांचा सुंदर मिलापसाधून त्याची फ्युजन नृत्य प्रकार हे शिक्षक व विद्यार्थी मिळून बसवितात.
या वर्षी या सर्वांना बगल देऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्ताने शाळेत यावर्षी स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनचरित्रपट उलगडण्यासाठी विविध प्रकारची नृत्य, नृत्यनाटिका, पोवाडा वेगवेगळ्या शैलीत सादरीकरण केले. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात व वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती होते. विद्यार्थी पालक अतिथीजन यांच्यासह सर्वांसाठी ही सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ठरते.
यावर्षी सांस्कृतिक प्रमुख सौ प्रज्ञा महाळुंगे व सौ विजयलक्ष्मी सणस यांच्या कल्पनेतून सुंदररीत्या साकारलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा एक सोहळाच होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांनी प्रास्ताविकेतूनच आपल्या विद्यार्थ्यांचे व अतिथीगणांचे मन जिंकले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री अशोकजी बागवे यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयाचा ठाव घेत भाषण न करता विद्यार्थ्यांची हलकाफुलक्या संवादातून त्यांना मार्गदर्शन केले. टेकडीच्या कुशीत वसलेल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुंदर निरागस हसऱ्या फुलांची उपमा देऊन साऱ्या विद्यार्थ्यांची मनात आणि जिंकली विद्यार्थ्यांना भाषण आवडत नाही अशा वेळेस आपल्या खुसखुशीत शैलीत आपलं म्हणणं विद्यार्थ्यांने सहज त्यांच्या हृदयाला भिडवलं.
मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे मुळातच मराठीची गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी विद्यार्थ्यांच्या नावाचा अर्थ काय आहे हा विचार करायला लावणारा त्यांचा संवाद सर्व अंगाने फलदायी ठरला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या या संभाषणाला या संवादाचा मनसोक्त आनंद घेतला. शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापिका यांचे त्यांनी भरभरून कौतुकही आणि पुन्हा पावसाळ्यात शाळेला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली.सरांच्या कवितेच्या सरीत आम्ही सर्व चिंब भिजून निघालो आणि या कवितांची मोहिनी घातली.
या सोहळ्यास दुसरे अतिथी लाभले होते ते म्हणजे न्युज स्टोरी टुडे या वेबपॉर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ. हे तर आम्हाला नेहमीच आमच्या शाळेच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी मदतही करतात. शाळेच्या उपक्रमांचे कौतुकही करतात आणि आज त्यांनी याची देही याची डोळा अशा आमच्या कार्यक्रमात शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्यांनी आस्वाद घेतला त्यांनीही विद्यार्थ्यांची संवाद साधला करिअरच्या विविध वाटा आणि त्यासाठी लागलेला लागणारा पूर्वभ्यास त्याविषयीची माहिती या संदर्भात बोलताना त्यांनी दिली. विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केले, त्यांनीही शाळेचं विद्यार्थ्यांचं, मुख्याध्यापिका यांचे भरभरून कौतुक केले मराठी माध्यमाच्या शाळांविषयी वाटणारी आत्मीयता ही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. शाळेत असणाऱ्या उपक्रमांविषयी त्यांना फार कौतुक होते हे त्यांच्या भाषणातून संवादातून दिसून आले, जाणवत होते.
संस्थेचे उपाध्यक्ष फडके सर यांनीही या कार्यक्रमांस उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्यासाठी छानसे गीत गायन केले आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वार्षिक पारितोषिक सोहळा उत्तरोउत्तर रंगत गेला. शाळेतील आदर्श विद्यार्थी शाळेत महाविद्यालयात झालेल्या विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला त्याचप्रमाणे दहावी शालांत परीक्षेत शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विविध विषयात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची कौतुक करण्यात आले.
पालकांसाठी घेतलेल्या पाककला स्पर्धेमध्ये विजयी असणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक देऊन त्यांचेही कौतुक करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हे पाहुण्यांसमोर सादर करण्यात आले यामध्ये शिवाजी महाराजांचा नृत्यनाटिकेतून जीवनपट उघडून दाखवणाऱ्या गीतांचे नृत्याचे सादरीकरण सादरीकरण अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आले. शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे एक मोठा सोहळा असतो आणि या सोहळ्यात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचा सिंहाचा वाटा असतो कारण हा कार्यक्रम नियोजन पूर्व पार पाडण्याकरिता या सर्वांची सर्वांचे सहकार्य लागते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपन्न करण्याचे आवाहन सर्व शिक्षकांनी मिळून पेलले व कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न झाला.
— लेखन : आस. नूतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व)
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800