Thursday, December 5, 2024
Homeलेखटेलिव्हिजन दिनाच्या निमित्ताने…

टेलिव्हिजन दिनाच्या निमित्ताने…

प्रारंभीचा टेलिव्हिजन हा यांत्रिक स्वरुपाचा होता. तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने १८८४ मध्ये
स्कॅनिंग डिस्क शोधून काढली. पुढे त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती.

मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली. ही क्रांती १९३५ पूर्वीची, १९३५ ते १९४१, दुसरे महायुद्ध, १९४६ ते १९४९, १९५० ते १९५९, १९६०-२००० अशा टप्प्यात होत गेली.

टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे. ‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजन होय.

१९९६ सालच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. म्हणून तो दिवस जागतिक दूरदर्शनदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली. पण भारतात १९९६ पर्यंत दूरदर्शन खेडोपाड्यात पोहोचले नव्हते. म्हणून या दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे.

सुरुवातीला प्राथमिक अवस्थेतील दूरदर्शनचा वापर शिक्षण, मनोरंजन नि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित होता. तसेच घरातील सर्व मंडळी एकत्र बसून दूरदर्शन पहात असत. तसेच १९९१ पासून भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे केवळ भारत सरकारची मक्तेदारी असलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन च्या क्षेत्रात खाजगी वाहिन्यांना प्रवेश मिळाला. बघता बघता या वाहिन्यांची संख्या वाढतच आहे. आज जवळपास ९०० खाजगी वाहिन्या आहेत. तसेच मोबाईल वर सुध्दा दूरदर्शन वाहिन्या दिसत असल्याने दूरदर्शनसंचासमोर बसूनच तो पाहण्याची काही गरज राहिलेली नाही.

अलिकडे तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दूरदर्शन चा क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सी.सी.टी.व्ही.) हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये, घरात असा सर्रासपणे वापरला जात आहे.

दूरदर्शनमुळे वाचन संस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो. तर दुसरीकडे दूरदर्शन वर विविध पुस्तकांवर होणाऱ्या चर्चेमुळे पुस्तकांची आवड आणि विक्री या वाढ होत चालली आहे, असेही दिसून येते.

संजीव वेलणकर

— संकलन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !