आषाढी एकादशी व व्यासपौर्णिमा निमित्ताने “गुरुवंदना”या कार्यक्रमाचे मराठी ग्रंथालयातील रेगे सभागृहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते डॉ. धनश्री साने यांचे “गुरुतत्त्व” आणि माननीय अंजली ख्रिस्ती यांचे “पसायदान” या विषयावरील व्याख्यान. ही दोन्ही व्याख्याने अतिशय उद्बोधक आणि रसाळ झाली.
डाॅ. धनश्री ताईंनी आपल्या गुरुतत्त्व व्याख्यानाची सुरुवात ज्ञानेश्वरांच्या गुरु वंदनेपासून केली. सद्गुरू जीवनाचा पथदर्शक असतो आणि तोच आपल्या शिष्याची पाठ राखण करीत असतो.गुरु हा आध्यात्मिक पिता असतो आणि गुरु चक्रवर्णाच्या चक्रातून सुटका करून मोक्ष पदाकडे नेतो. त्यांनी गुरूंची अनेक रूप यावेळी सांगितली.
मा. अंजली ख्रिस्ती यांनी पसायदानावर बोलताना सांगितले की, गुरु हा मनाच्या विकासाचा भाग आहे. ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे शुभेच्छा असे सांगून पसायदानाचा भावार्थ उलगडला.
यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त आणि आधारस्तंभ आदरणीय उषाताई चांदुरकर यांचा “सहस्त्र चंद्र दर्शन” सोहळ्या निमित्त संस्थेकडून सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील ज्ञानसंपन्न शिक्षकांचाही सन्मानपत्र, पुष्प भेट, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि अपर्णा पेंडसे यांच्या गुरुवंदना या सुरेल नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संथेच्या कार्यवाह शुभांगी गान यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल विशद केली.
अश्विनी चौधरी यांनी दोन्ही मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्माताई हुशिंग व संस्थेच्या सचिव वृषाली राजे यांनी त्यांचा सत्कार केला.
संस्थेच्या सल्लागार वासंती वर्तक, सचिव वृषाली राजे, कार्यवाह शुभागी गान यांच्या हस्ते ३३ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय संस्थेच्या खजिनदार प्रतिभा चांदुरकर यांनी करून दिला.
संस्थेच्या कार्यवाह अस्मिता चौधरी यांनी आभार प्रदर्शन केलं .तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जोशी यांनी अत्यंत रसाळ केले.
धुवाधार पाऊस पडत असताना देखील संस्थेच्या सर्व सभासदांनी गुरुवंदना कार्यक्रमाचा मनभरून आनंद घेतला.
यावेळेस संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त, सल्लागार, उपस्थित होते. संस्था अध्यक्ष प्रा.पद्मा हुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे समितीने हा सुनियोजित कार्यक्रम अत्यंत आनंदाने साजरा केला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800