आपल्या ‘न्युज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल चे ठाणे येथील स्नेहमिलन श्री हेमंत व सौ मेघना साने यांच्या घरी नुकतेच अतिशय सुंदर झाले.
या स्नेहमिलनाविषयीच्या उस्फुर्त प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१
मेघना आणि देवेंद्र मला बोलावल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
थोडा वेळ का होईना पण सगळ्या जुन्या माणसांची भेट झाली हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे.
- –– वासंती वर्तक. दूरदर्शन निवेदिका
२
खूप छान झाले get- together. सर्व जण आले.खूप आनंद वाटला.
खास करून डॉ. सुलोचना गवांदे यांची मुलाखत खूप रंगली. उपस्थितांनी प्रश्न विचारून वेगवेगळे मुद्दे चर्चेला आणले.
खूप खूप धन्यवाद मिस्त्री सर, शूटिंग टीम घेऊन आल्याबद्दल !
अस्मिता आणि प्रतिभा तुम्ही पण छान खाऊ आणलात.खूप मनापासून मदत केलीत.
भुजबळ सर तुमच्यामुळे खूप मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले.आपला पोर्टलचा परिवार खूप छान आहे.
- — मेघना साने.
३
कॅन्सर सारखा गंभीर विषय असूनही कार्यक्रम कुठेही कंटाळवाणा झाला नाही. राम खाकाळ सर, नितिन केळकर सर ही नावं फक्त ऐकली होती…आज ती व्यक्तीमत्वं प्रत्यक्ष पहायला मिळाली. आजची संध्याकाळ, यादगार शाम… धन्यवाद भुजबळ सर आणि अलका मॅडम 👍👍
- — विकास भावे
४
खूप छान झाला कार्यक्रम. डॅा. सुलोचना गवांदेंची मुलाखत खूपच उपयुक्त वाटली, छान रंगली. कालच्या गेट टुगेदरच्या निमीत्ताने खूप नामवंत मंडळींना भेटण्याचा योग आला. श्री व सौ. भुजबळांना भेटून खूप आनंद झाला.
हे सगळं घडवून आणल्याबद्दल मेघनाताई व हेमंत साने सरांचे मनःपूर्वक धन्यवाद !🙏🏻🙏🏻
कालच्या मुलाखतीचे प्रसारण कधी होणार ते इथे कळेल ना..?
- — डॉ मीना बर्दापूरकर
५
कार्यक्रम उत्तम झाला. डॉ. सुलोचना ताईंची मुलाखत, त्यातून आपल्या मनातील शंकाचे निरसन, देवेंद्र सर, अलकाताईंनी आपलेपणाने केलेले स्वागत,सामाजिक कार्याला वाहून घेतलेली नामवंत तरीही आपल्यातले एक होऊन वावरणाऱ्या थोर मंडळीचा लाभलेला सहवास, मेघनाताई आणि साने सरांचे अगत्यपूर्ण मेहनतीने केलेले आणि पार पाडलेले नियोजन… सगळंच उत्कृष्ठ होतं.
ही रम्य संध्याकाळ कायम आठवणीत राहिल अशीच !!!!
धन्यवाद मेघनाताई, आम्हाला ह्या अनोख्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल 🙏🙏
- — अस्मिता चौधरी.
६
खरच खूप छान झाला कार्यक्रम.खूप सहज, सोप्या भाषेत डॉक्टरांनी समजावून सांगितले..
खरच..मेघनाताई आणि साने सर, खूप धन्यवाद..
देवेंद्र सर आणि अलका ताई तर नेहमीच उत्तेजन देतात, लिहिण्यासाठी..
काल अनेक मान्यवर भेटले..साहित्यिक अनुभवाचा हा सोहळा उत्तम रंगला..ह्यात आम्हाला सहभागी केल्याबद्दल खूप खूप आभार..🙏🏽🙏🏽
असाच स्नेह लाभू दे..🌹🌹
- — प्रतिभा चांदूरकर.
७
मुलाखत खूपच महत्वाची होती. सुलोचना ताईंचे कार्य अतुलनीय…तसेच आपलं गेट टुगेदर, भेटीगाठी खूप छान झाल्या… सर्वांचा जीवन प्रवास काबीले तारीफ… मला या परिवारात सामावून घेतल्याबद्दल मेघना, भुजबळ सर, अलका ताई या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
- — ज्योती कपिले.
८
न्यूज स्टोरी टुडे गेट-टुगेदर नावाप्रमाणे शिस्तबद्ध आणि आनंददायी असा सोहळा होता.
न्यूज स्टोरी चे निर्माते भुजबळ सर अलका आणि सह्याद्री वाहिनी वरचे नामवंत पदाधिकारी त्यांच्याबरोबर संवाद साधताना कालची संध्याकाळ आनंदी झाली.
कॅन्सर संशोधक डॉ. सुलोचना गावंड मॅडम यांनी कर्करोगावरील केलेले संशोधन आणि श्रोत्यांना दिलेली उत्तर खूप छान शंकांच निरसन करणारी होती.
कार्यक्रमाच नियोजन मेघनाताई आणि साने सर यांनी खूप उत्तम प्रकारे केलं.
डॉ. गवांदे मॅडम यांची मेघनाताईंनी घेतलेली मुलाखत, श्रोत्यांशी साधलेला सुसंवाद समर्पक.
ज्योतीताई कपिले आणि नेहा हजारे यांची ओळख झाली.
पुन्हा एकदा मेघना ताई आणि अलका आणि भुजबळ सरांचे आभार.
— डॉ अंजूषा पाटील.
९
एक “संस्कार” मय अविस्मरणीय संध्याकाळ…!
“पुणे तिथे काय उणे” हे फार जुने झाले; मात्र आता…ठाण्यातल्या आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तींना भेटून “ठाणे तिथे काय उणे” हे सिद्धच झाले.
अर्थात याचे संपूर्ण श्रेय, आदरणीय देवेंद्र भुजबळ सर आणि सौ.अलका मॅडम, श्री.हेमंत साने सर आणि सौ.मेघना मॅडम तसेच “STAR OF THIS WONDERFUL EVENING- Dr. सुलोचना गवांदे मॅडम” याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे आहे.
आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अन् आभारही…!
🙏🏻💐🌹😊🙏🏻
- — मनोज सानप. जिल्हा माहिती अधिकारी
१०
माध्यमातले अनुभवी सहकारी आणि मित्र ज्यांच्या बरोबर 25/30 वर्ष एकत्र काम केलं असे लेखक , अधिकारी , संपादक, डॉक्टर यांचा हा आनंद सोहळाच होता .
- — भूपेंद्र मिस्त्री.
निवृत्त आकाशवाणी. सह संचालक
११
तुम्हा सर्वांचे अगत्य, उत्साह आणि तुम्ही माझ्या कामाबद्दल केलेले कौतुक याने माझे मन भरून आलेय. मला काल मुलाखत करताना तुमच्या उपस्थितीमुळे फार आनंद झाला. तुमचा या विषयातील रस बघून मला समाधान वाटले. त्याहून अधिक म्हणजे तुम्ही दाखवलेली आपुलकी. मी कालच्या संध्याकाळची सुखद आठवण कायम मनात जतन करेन.
मेघनाताई, हेमंतभाऊ, तुमच्या प्रेमळ आतिथ्यासाठी मी आभारी आहे. बाकी सर्व उपस्थितांना अनेक धन्यवाद. भुजबळ दांपत्याची मैत्री आणि सहकार्य याने माझे आयुष्य अधिक समृध्द झाले आहे. 🙏
- — डॉ सुलोचना गवांदे
१२
खूप छान, अनौपचारीक आणि हृद्य सायंकाळ. देवेंद्रजी आणि अलकाताई, मेघना हेमंत धन्यवाद…👍👍👏🏻
- — मिलिंद बल्लाळ. संपादक (ठाणे वैभव)
१३
मेघनाताई आणि हेमंत जी आपण या g२g चे आयोजन करून जो आनंद दिलात त्या बद्दल शतश: आभार👏. उपस्थित सर्वच दिग्गज साहित्यिक मंडळीचे सुध्दा मन:पूर्वक आभार. 👏 आपणा सर्वांची ओळख होतीच, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद हा वेगळाच. भूपेंद्रजी मिस्त्री सर, आपल्या कालच्या चित्रीकरणा मुळे न्युज स्टोरी टुडे परिवार आणि मेघना ताई आणि डॉ गवांदे मॅडम ची मुलाखत जनमाणसापर्यंत पोहोचण्यास फारच उपयुक्त ठरणार आहे, आपल्या टीम चे शतश: आभार. 👏 परत भेटूच… 🤝🤝🤝🤝
- — अलका भुजबळ. निर्माती (न्युज स्टोरी टुडे)
- — टीम एनएसटी. ☎️ 9869484800