Saturday, July 27, 2024
Homeबातम्याठाणे : ५ काव्यसंग्रह प्रकाशित

ठाणे : ५ काव्यसंग्रह प्रकाशित

प्रतिभावंत कवी भाषाप्रभू श्री. राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ५ कविता संग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक श्री. दिलीप गडकरी यांच्या शुभ हस्ते रविवार दि.२६ मे २०२४ रोजी ठाण्याच्या मराठी संग्रहालयाच्या कै. वा. अ. रेगे सभागृहात कऱण्यात आले.

प्रमुख पाहुणे माननीय दिलीप गडकरी, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आणि कार्यकारिणी सदस्य मोहन देसाई, ज्येष्ठ समीक्षक अनंत देशमुख, ज्येष्ठ कवी बाळ कांदळकर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गडकरी यांनी अजित महाडकर (हायकू बहर), संपदा देशपांडे (काव्यसंपदा), आश्लेषा राजे (घननीळ), स्वाती दोंदे (मैत्र शब्दसूरांचे) आणि (पदन्यास) विजय फडणीस यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

भावाशयाला चिंतनाची जोड लाभल्यामुळेच समृध्द अभिव्यक्तीच्या आशय संपन्न कविता सर्वजण लिहू शकले या शब्दात त्यांनी सर्व कवी – कवयित्रींच्या लेखन व्रताचे कौतुक केले.
त्यांनी सर्व कवींनी अवलोकन, आकलन, वाचन, चिंतन, लेखन ही पंचतत्वे लक्षात ठेवत पूर्वसुरिंची मळवाट तुडवण्यापेक्षा स्वतःची पाऊलवाट चोखाळत विविध विषयांवर साहित्य निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गडकरी यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि कवी नारायण सुर्वे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

सदर प्रकाशन सोहळा ख्यातनाम लेखक, कवी व चित्रकार रामदास खरे, कवी विकास भावे, जेष्ठ कवी लेखक श्री सुनील चिटणीस, कवी बाळासाहेब तोरसकर, कवी व हायकूकार प्रकाश पोळ, लेखिका व कवयित्री डॉ. प्रतीक्षा बोर्डे, डॉ. मंजुषा पाटील, कवयित्री, लेखिका सौ. अलका वढावकर, कवयित्री सानिका पत्की, इतर मान्यवर आणि अनेक रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत दिमाखदारपणे पार पडला. स्वाती शृंगारपुरे यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. या प्रकाशन सोहळ्यास अनेक कवी, कवयित्री तसेच रसिक आवर्जून उपस्थित होते.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खरंतर आपल्या पाच ( सहा होणार होते, पण दुर्दैवाने एक वगळले गेले) सुहृदांच्या पुस्तकांच्या एकत्रित प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहाण्यासाठी वारंवार आमंत्रण येऊनही दूर अंतरावरून जाऊ शकत नसल्याची खंत मनात बाळगत असतानाच, अशा सुंदर प्रकाशन समारंभाचा “आंखो देखा हाल” सांगणारा अतिशय सुंदर वृत्तांत माननीय लेखक श्री.सुनील चिटणीस सरांच्या लेखणीतून वाचल्यावर दुधाची तहान ताकावर भागल्यामुळे, समारंभात उपस्थित राहू न शकल्याची खंत कमी झाली . हे सर्वच पाचही कवी-कवयित्री उत्तम दर्जाची काव्य निर्मिती करत आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सन्माननीय पत्रकार दिलीप गडकरी ह्यांच्या सारख्या दर्जेदार साहित्यिकांच्या हस्ते संपन्न होणे आणि ह्या समारंभाचे सूत्रसंचालन सन्माननीय कवयित्री, नव्हे साहित्याची अविरत सेवा करण्याचा वसा हाती घेतलेल्या “शब्दमोती साहित्य मंच” च्या संस्थापिका सौ. स्वाती शृंगारपुरे ह्यांनी रसाळ व ओघवत्या शब्दांत करणे, हे ह्या प्रकाशन समेरंभाचे प्रमुख आकर्षण होते.दोघांच्या वक्तृत्वाने समारंभाला केशरमिश्रित दुधाचा गोडवा लाभला असल्यास नवल नाही. सर्वच साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
    सन्माननीय सुनील चिटणीस सरांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम निवेदन करणारा लेख लिहून आम्हाला ह्या समारंभात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनादेखील मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८