Thursday, May 30, 2024
Homeबातम्याडॉ.आंबेडकर वा.अ.महाविद्यालय : जयंती वृत्तांत

डॉ.आंबेडकर वा.अ.महाविद्यालय : जयंती वृत्तांत

मुंबई येथील पीईएस शिक्षण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती कॉलेजच्या प्र. प्राचार्या डॉ. यशोधरा श्रीकांत वराळे यांच्या मार्गदर्शनाने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामल गरुड उपस्थित होत्या . त्यांनी “बाबासाहेबांविषयी व समाजातील स्त्रियांचे सद्यस्थितीतील स्थान” यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. संजीव बोधनकर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव यांनी भूषविले.

विचारमंचावर श्री. आशिष गाडे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य, प्र. प्राचार्य सूनतकरी, सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट, यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रो. खरतड यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. बनसोडे सरांनी केले.

यावेळी प्र. प्राचार्य डॉ. डी . ए.गवई, विधी महाविद्यालय वडाळा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.निरभवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पाटील, विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोनकर, तसेच अन्य मान्यंवर उपस्थितीत होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी बहुमोल सहकार्य केले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments