Monday, February 17, 2025
Homeसेवाडॉ सुलोचना गवांदे : लोकाभिमुख संशोधक

डॉ सुलोचना गवांदे : लोकाभिमुख संशोधक

कोणे एकेकाळी कर्क रोगाचे प्रामुख्याने चार पाच प्रकारच आपल्याला माहिती होते. पण आता ही संख्या जवळपास १०० च्या वर गेली आहे. कर्क रोग आणि इतर रोग, आजार यातील प्रमुख फरक म्हणजे इतर रोग, आजार हे आपल्या शरीराच्या बाहेरून आपल्या शरीरात येणाऱ्या जीवजंतूंमुळे होतात तर कर्करोग हा आपल्या शरीरातील पेशीतूनच निर्माण होत असतो. कर्करोग झाल्याचे निदान होताच केवळ रुग्णच नव्हे तर त्याचे कुटुंबीयही गर्भगळीत होतात, इतकी या रोगाची अजूनही धास्ती आहे.

अशा या कर्करोगावर डॉ सुलोचना गवांदे मॅडम गेली जवळपास ४० वर्षे अमेरिकेत संशोधन करीत आहेत. पण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला केवळ प्रयोग शाळे पुरते, या विषयावर होणाऱ्या परिषदांपुरतेच बंदिस्त करून न ठेवता सामान्य माणसाला कर्क रोगाची, त्या विषयी सुरू असलेल्या संशोधनाची अद्ययावत माहिती मिळावी, त्यांना धीर – दिलासा मिळावा म्हणून त्या विविध प्रकारे प्रयत्नशील असतात.

डॉ सुलोचना गवांदे यांची कर्करोगाविषयीची व्याख्यानमाला मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली आहे. तर याच विषयावरील लेख माला महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. पुढें या लेख मालेवर आधारित “कर्करोग आणि आपण” हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे. तर गेल्याच वर्षी “रिव्हिलिंग सिक्रेट्स ऑफ कॅन्सर” हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे.

इतक्या गंभीर विषयाशी निगडित असूनही त्यांना ललित लेखनाची खूप आवड आहे. मराठी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व असून त्यांचे काही ललित लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाले आहेत, ही आपल्या पोर्टल साठी मोठीच अभिमानाची बाब आहे.

डॉ गवांदे यांचा कर्करोगावरील लसी बाबतचा लेख नुकताच महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाला असून आपण हा लेख पुढील लिंक वर क्लिक करून जरूर वाचा.

https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/dr-sulochana-gawande-article-on-cancer-vaccinesexpectations-and-reality/articleshow/117197012.cms

तसेच डॉ गवांदे यांची अतिशय महत्वाची मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून ऐकू व पाहू शकता.

मी, माझे कुटुंब, माझे घर, माझा व्यवसाय इतकेच आपले सीमित जग आणि जीवन न ठेवता आजही जगभरच्या माणसांना वेठीस धरणाऱ्या कर्करोगाविषयी यथायोग्य जनजागृती व्हावी, त्यांचे कर्करोगविषयीचे आकलन वाढावे, मानसिक क्षमता वाढावी, मुळात आपल्याला कर्करोग होऊच नये म्हणून आपली जीवनशैली कशी असावी, या विषयी आंतरिक तळमळीने काम करीत असलेल्या डॉ सुलोचना गवांदे या “स्वार्थ आणि परमार्थ” याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या प्रयत्नांमध्ये, उपक्रमांमध्ये आपण काही हातभार लावू शकत असल्यास अवश्य लावू या.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments