Tuesday, July 23, 2024
Homeयशकथातरुणांनो, कधीही निराश होऊ नका-देवेंद्र भुजबळ

तरुणांनो, कधीही निराश होऊ नका-देवेंद्र भुजबळ

अपयश हे क्षणिक असते. त्यामुळे अपयशाने खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल अजिबात उचलू नये, असे प्रतिपादन ‘न्युज स्टोरी टुडे’ या वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी “भारतसत्ता” या लातूर येथील पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत केले. ही मुलाखत श्री राहुल लोंढे यांनी घेतली आहे.

एका प्रश्नाचे उत्तर देताना श्री भुजबळ यांनी सांगितले की, केवळ दहावी, बारावी च्या परीक्षेत अपयश आले म्हणूनच केवळ विद्यार्थी आत्महत्या करतात असे नाही, तर आयआयटी सारख्या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ११५ विद्यार्थ्यांनी गेल्या १० वर्षात आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. तर गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या १ लाख ४० हजार आत्महत्यांपैकी ९० हजार आत्महत्या या युवकांनी केलेल्या आहेत. युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात अशी परिस्थिती निर्माण व्हावी ही चिंतेची बाब आहे, असे सांगून त्यांनी कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती बाबत विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

स्वतःचेच उदाहरण देताना, श्री भुजबळ म्हणाले, मी दहावीत नापास झालो. दोन वर्षे शिक्षण सुटले. पण शिक्षणाचे महत्व लक्षात आल्याने पुन्हा शिक्षणाकडे वळालो. नोकरी करीत शिक्षण घेतले आणि अथक परिश्रम केल्याने एक सोडून भारत सरकारच्या ४ (चार), महाराष्ट्र शासनाच्या एका राजपत्रित पदासाठी आणि शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली. अपयश हे क्षणभंगुर असते. त्यामुळे त्याने खचून जाऊ नये तर यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये असेही ते म्हणाले.

करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, कल, क्षमता ओळखून करावी व यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना समजून घेऊन साथ द्यावी असे सांगून या दृष्टीने त्यांनी लिहिलेली “आम्ही अधिकारी झालो” आणि ७०० कोर्सेस ची माहिती असलेले “करिअरच्या नव्या दिशा” ही पुस्तके युवकांना, त्यांच्या पालकांना नक्कीच उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. भुजबळ सर, तरुणाईला मार्गदर्शन करणारा अतिशय उत्तम लेख लिहिला आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात “परीक्षेतील यश हाच जीवनातील सफलतेचा एकमेव मार्ग” असे समीकरण बनत चालले आहे. त्यामुळेच असे अपयश आले तर विद्यार्थीच काय, पालक सुद्धा ते पचवून घेऊन जीवनात पुढे जाण्याचे मार्ग शोधत नाहीत, त्याऐवजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशा बालक आणि पालकांना मार्गदर्शन करणारे तुमचे स्वानुभव आणि तुम्ही लिहिलेली दोन्ही पुस्तके त्यांच्या जीवनाला नक्कीच सुयोग्य दिशा दाखवतील, असा विश्वास आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि अशा प्रेरणादायक लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐

  2. खूपच छान ,देवेंद्र साहेब …! महत्त्वाच्या विषयावर आपण प्रकाश टाकलेला आहे.
    मनापासून धन्यवाद…! 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः