सूर्याचे तेज अन् चंद्राची शीतलता तू
फुलांचा गंध अन् पाण्यातील ओलावा तू
सागराचे क्षार अन् चकचकणारी वीज तू
मेघांना पळवणारा अन् पावसाची धार तू
आकाशातील इंद्रधनू अन् शिखराची उंची तू
वेलींची लवचिकता अन् महावृक्षाची स्थिरता तू
संगीतातील भावना अन् भजनातील भक्ती तू
कवींची प्रतिभा अन् गायकाचा सुर तू
माझ्यातील तू अन् तुझ्यातील मी ही तूच
शरीरातील आत्मा अन् ईश्वराचा अंश ही तूच
— रचना : आशी समीर नाईक.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान….छान…तू …कविता