Wednesday, October 9, 2024
Homeबातम्या"ते" प्रमाणपत्र बनावट ! - आर विमला

“ते” प्रमाणपत्र बनावट ! – आर विमला

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात “महावाचन उत्सव, २०२४” मधील सहभागाबाबत मिळणाऱ्या प्रशस्तीपत्रामध्ये चुका असल्याचे काही माध्यमांमधून दाखविण्यात येत आहे. तसेच या प्रशस्तीपत्राचे छायाचित्र सुध्दा प्रसिद्ध होत आहे. मात्र हे प्रशस्तीपत्र खरे नसल्याचे प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला (आय ए एस) यांनी स्पष्ट केले आहे.

संचालक आर. विमला (आय ए एस)

या उपक्रमाची आणि प्रशस्तीपत्र देण्याबाबतची सविस्तर माहिती देताना श्रीमती आर विमला यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेली प्रशस्तीपत्रे अचूक आहेत. त्यामुळे ‘महावाचन उत्सव २०२४’ मधील सहभागाबाबत मिळणाऱ्या प्रशस्तीपत्रामध्ये चुका असल्याचे काही माध्यमांमधून दाखविण्यात येत असलेले प्रशस्तीपत्र खरे नसल्याचे सांगून त्यांनी बनावट प्रशस्तीपत्रामध्ये उल्लेख असलेल्या शाळेला याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले.

कार्य पद्धती : महावाचन उत्सव २०२४ मध्ये सहभागी होण्याऱ्या विद्यार्थ्यांची माहिती वेबॲप्लीकेशनमध्ये भरल्यानंतर शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानंतर ही माहिती शाळेच्या डॅश बोर्डवर दिसते. ही माहिती योग्य असल्यास डॅशबोर्ड वर जनरेट सर्टिफिकेट लिंकवर क्लिक केल्यानंतर यासाठी विकसित करण्यात आलेल्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर प्रशस्तीपत्र ऑनलाईन उपलब्ध होते. त्यामुळे बनावट प्रशस्तीपत्रावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments