निघतात काही माणसे
स्वतःला शोधण्यास पण…
हरवून बसतात स्वतःलाच….!
त्यांचं हे हरवलेपण ही,
खूप काही देऊन जाते
इतरांना….!
देणाऱ्याला तर,
आपण काही देत आहोत
याची जाण उरत नाही……
पण घेणारेही जपतात,
काही विभ्रम
देणाऱ्याचं दातृत्व जपण्यासाठी !
— रचना : प्रिती प्रवीण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कवितेचा विषय खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला आहे
सर्व सामान्यांना सुद्धा वाचता वाचता समजेल अशी ही अर्थपूर्ण कविता आहे
खूपच छान कविता आहे
अशा प्रकारे आणखी काव्यरचना तुझ्या हातून होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप सुंदर कविता