Saturday, April 13, 2024
Homeबातम्यादिल्लीतील दिवाळी

दिल्लीतील दिवाळी

शरद पौर्णिमेची शीतलता दिल्लीकरांकरिता दिवाळीची चाहूल घेऊन येते. महाराष्ट्रा प्रमाणे दिल्लीत ‘अॉक्टोबर हिट’ चा तडाखा जाणवत नाही. दिल्लीत त्याऐवजी चंद्र कलेकलेने आल्हाददायक वातावरण वाढवत असतो.

यंदा श्रावण महिन्यादरम्यान आलेल्या अधिकमासाने दिवाळीनंतरचं प्रदूषण मात्र दिवाळीपूर्वीच जाणवू लागले. पर्यावरणातील बदल मात्र आल्हाददायक न होता काळजीत परावर्तित करणारा होता. 

 दिल्ली मराठी प्रतिष्ठान गेली सात वर्षे सातत्याने यशस्वीपणे हवेतील सुखद गारव्या सोबत दिवाळी पहाटचा कार्यक्रम आणि दिग्गज गायकांची इंडिया गेट आणि सेंट्रल पार्कच्या साक्षीने विशेषतः श्री वैभव डांगे, श्री.विवेक गर्गे, श्री. अभिजीत गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली रंगलेल्या मैफिलीचे आयोजन करत आला आहे. 

यंदा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह दिल्लीकरांना उपस्थितीची आणि हितचिंतक भेटींची अचानक हवेतील बदलाने रजिस्ट्रेशन संख्या हजारच्यावर असतानाही काहीशी काळजी होती. पण ही काळजी काल सकाळी सहा वाजता सेंट्रल पार्कच्या अवतीभोवतीचे रस्ते आणि रविवार असून मेट्रोतून भरजरी साड्या, पैठण्या नेसलेल्या महिला विशेष ठेवणीतील झब्बा – कुर्ता घातलेले, क्वचित काहींनी तोंडाला लावलेले मास्क मधील महाराष्ट्रीयन बांधव बघून दूर झाली.

या सगळ्यांच्या स्वागताला आकाशकंदील आणि संस्कार भारतीची भव्य रांगोळी, सोबतच महाराष्ट्रीयन विविध खाद्य पदार्थ, कपड्यांचे स्टॉल्स बघून दिल्ली एन. सी. आर. नोएडा, फरिदाबाद, द्वारका येथील रसिक प्रदूषणाला विसरुन दिल्लीतील आपल्या मराठी बांधवांना भेटून हर्षित झाले होते.

नव्हे तर नेहमी प्रसिद्धी माध्यमांपासून ते बृहन्महाराष्ट्रातील ‘मराठी माणूस’ आणि  महाराष्ट्र मंडळांना आठवण येते ती  गावाकडच्या दिवाळीची. राजधानीत येताना गाव तर सोबत आणता येत नाही पण, गावाकडच्या काही प्रथा दिल्लीच्या तख्तापर्यंत निश्चितच आणता येतात .अशीच एक प्रथा दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाची अनुभूती घेण्यात रमली होती.

यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आठ दिवस अलिकडे घेण्याचे प्रयोजन आहे. कामानिमित्त स्थिरावलेल्या दिल्लीस्थित बृहन्महाराष्ट्रीयनांची इच्छा असायची की ऐन दिवाळीतच दिल्लीतल्या या संगीतमय मैफिलीला गावाकडे गेल्याने उपस्थित रहाता येत नाही. तेव्हा रसिकांच्या आवडीला प्राधान्य देऊन नियोजन आधीचे करण्यात आले.

मराठी प्रतिष्ठान यंदाचे हे आठवे वर्ष तेव्हा आकर्षण ही तितकेच होते. ते मैफिलीत महाराष्ट्रातील युवा संगीतकार, गीतकार, पार्श्वगायिका आणि अलिकडेच निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्राची राजदूत गायिका वैशाली सामंत ने सुरेल स्वरांनी रंग भरले.

अलिकडेच प्रदर्शित होणारा सिनेमा झिम्मा -२, जीवलगा मालिकेचे पार्श्वगीत,  महाराष्ट्राची लोकधारा लावणी, गुलाबाची कळी, आभास हा, ऐका दाजीबा, हिंदी मराठी युगलगीत आणि तिच्याच आवाजातील अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे “कोंबडी पळाली…”! ते “डिप्पार डिप्पार… अवधूत गुप्ते यांच्या लोकप्रिय गाण्यांची प्रस्तुती केली.
दिल्लीकर मराठी श्रोत्यांनीही या  मैफिलीतील  गाण्यांना अनेकदा वन्समोअर दिले. तर अनेकदा लय तालाच्या सुंदर पदन्यासानेही उत्स्फूर्त दाद दिली.

याशिवाय तिने यावेळी मतदार जागृती करिता रचलेले गाणंही सादर केले.

कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाताना महाराष्ट्रीयन पध्दतीतील गंमतीशीर उखाणेही उपस्थित श्रोत्यात प्रशासकीय अधिकारी सुप्रिया देवस्थळी, पत्रकार निवेदिता मदाने-वैशंपायन, काही उद्योजिका ते गृहिणींनी घेतले.

मध्यंतरात गायिका वैशाली सामंत समवेत निवेदिका प्राजक्ता मांडके, वाद्यवृंदात सिथेंसायझर अमृता ठाकूर देसाई, निनाद सोलापूरकर, नागेश भोसेकर, ध्वनी यंत्रणा राजरत्न पवार, गिटार रमण उत्गल, तबला – ढोलक- नितीन शिंदे, ऋतूजा कोरे, मानसी दातार, अजित विस्पूते यांचे स्वागत सत्कार पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

दिवाळी पहाटला दिल्लीस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशेषतः परराष्ट्र व्यवहार विभाग प्रभारी विजय चौथाईवाला, भारतीय जनता पक्ष दिल्ली प्रांताचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, श्याम जाजू (माजी उपाध्यक्ष) आदी उपस्थित होते.

यावर्षीचे दिवाळी पहाटचे वैशिष्ट्य ‘युवा मंच’ स्थापनेसाठी प्रस्ताव आणि सूचना मागविण्यात आल्या. याशिवाय जगभरातील विविध क्षेत्रातील महाराष्ट्रीयन व्यावसायिक ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व एकमेकांच्या संपर्कात, कार्यक्षेत्रात परस्परपूरक व्हावीत या संदर्भातील ही प्रस्ताव मांडण्यात आला.

दिवाळी पहाटला यापूर्वी महेश काळे, सोनाली कुलकर्णी – २०१६
राहुल देशपांडे, मधुरा दातार, सुधीर गाडगीळ – २०१७
सावनी शेंडे, बेला शेंडे अभिजीत  खांडकेकर – २०१८
सुरेश वाडकर – २०१९
पंडित शौनक अभिषेकी – २०२०
केतकी माटेगावकर सुवर्णा माटेगावकर ऋषिकेश रानडे – २०२१
अवधूत गुप्ते २०२२
या सप्तक दिग्गज गायकांनी दिवाळी पहाट सुरेल स्वरांनी सुखद केली आहे.

— टीम डी. एम. पी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments