हळूहळू दुकाने ती सजू लागली,
तोरणे, पूजा, उटणी, रंग रांगोळी,
फटाके, आकाशकंदील, पणत्या,
फराळाचा सुवास, दरवळू लागला,
सडे, रांगोळ्या, घर-घर,सजू लागले,
खरेदी कोणती, गप्पा झडू लागल्या,
कपडे, भांडी, दागिने, नवे नवे हवे,
नवे घर, नवी गाडी, हर्ष वाढू लागला,
सगळ्या घरात पसरला, बघा आनंद,
सुटी लागली, मुले, खेळात झाली धुंद,
नातेवाईक दूरचे, घरी आता येऊ लागले,
स्वागत, विचारपूस, सोहळा कसा चालला,
उपवरांची बघा, होई नवी धावपळ,
कुणाचे ते ठरले, कोण नवीन तयार ?
चौकशी सारे हीच, बघा करू लागले,
स्थळ चांगले कोणते, संवाद तो रंगला,
उत्सव दीपावली, आहे खूप मोठा,
सारे करती साजरा, उत्साहाचा असे वाटा,
मनातले सारे बघा, बोलण्याची संधी,
नाती घट्ट होती, चित्ती आनंद दाटला..!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800