ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, बोल्डा,ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिका डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख यांची निवड करण्यात आली आहे. भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंती निमित्त आयोजित या एकदिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, गजल मुशायरा, निमंत्रितांचे कवीसंमेलन आदि कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
याच कार्यक्रमात ख्वाजाभाई बागवान लिखीत काव्यसंग्रह “आयुष्याच्या वाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा”, चारोळी संग्रह” “क्षणभंगूर हे जीवन” या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
हे साहित्य संमेलन सोलापूर येथील सोशल महाविद्यालय, न्यू बिल्डींग, सैफी हाॅस्पिटलच्या समोर, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
या संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. अजीज नदाफ, प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी, संपादक अय्युब नल्लामंदू, मुबारक शेख, हसीब नदाफ, डॉ. सुरय्या जहागीरदार, प्राचार्य डॉ.फारूक शेख, प्राचार्य डॉ. शकील शेख ,डॉ .युसूफ बेन्नूर , संपादक मजहर अल्लोळी , मलेका शेख तर ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने कवी अॅड. हाशम ई. पटेल, खाजाभाई बागवान , डाॅ. सय्यद जब्बार पटेल , शेख शफी बोल्डेकर , प्राचार्य अनिसा सिकंदर शेख , डाॅ. महंमद रफी शेख , इस्माईल शेख , जाफरसाहाब शेख , तहेसीन सय्यद, निलोफर फणिबंद, नसीम जमादार, गौसपासा शेख, मोहम्मद अब्दुल रहीम,महासेन प्रधान यांनी केले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800