विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या धोरणानुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांना ३ वर्षांपासून स्वायत्तता प्रदान करण्यात येत आहे. या धोरणानुसार ठाणे येथील प्रख्यात विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान करण्यात आली. त्यामुळे या महाविद्यालयाने बी ए, एम ए (मराठी) विषयाच्या अनुषंगाने अभ्यास मंडळ (Board of Studies) गठीत केले होते. त्यावेळी माध्यम जगतातील तज्ञ म्हणून श्री देवेंद्र भुजबळ यांची निवड केली होती. आता पूर्वीच्या मंडळाची मुदत संपल्याने हे मंडळ नव्याने गठीत करण्यात आले असून नव्या मंडळात श्री देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील ३ वर्षांसाठी आहे.
वृत्तपत्र पत्रकारिता, भारत सरकारचे दूरदर्शन, महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि आता डिजिटल मीडिया मिळून जवळपास ४० वर्षे श्री भुजबळ प्रसार माध्यमात सक्रिय आहेत. त्यांची आता पर्यंत ८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
भुजबळ सर खूप खूप अभिनंदन!🌷👍
अभिनंदन देवेंद्रजी.
हार्दिक अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर. आपली पुनश्च निवड होणे, ही आपल्याप्रमाणेच आपल्या वाचकांसाठी, आमच्यासारख्या स्नेहीजनांसाठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी वर्गाला पत्रकारिता व लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्याची स्फूर्ती प्राप्त होईल, ह्याची खात्री आहेच. आपल्या ह्या नवीन कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपले प्रेम,लोभ असाच कायम असू द्या.
एका महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळावर भुजबळ सरांची निवड ही निस्चितच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे.
अभिनंदन देवेंद्र
जी.आपली निवड आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब झाली आहे.अर्थात ही निवड गेल्या चाळीस वर्षांच्या व्यासंगातून,कर्तृत्वातून, माध्यम क्षेत्रातील कार्यातून, असाधारण अभ्यासूवृत्ती आणि अविरत परिश्रमातून झाली आहे. हा आपला एकप्रकारे निष्ठापूर्वक कार्याचा गौरवच आहे .आपले मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… सुधाकर तोरणे.
🌹अभिनंदन भुजबळ साहेब
आपले खूप अभिनंदन. योग्य व्यक्तीची निवड झाली की कृतार्थ वाटत.तस आपल्या बाबतीत वाटत आहे. पुनश्च अभिनंदन!
मनापासून अभिनंदन, देवेंद्र साहेब…!!🙏
अभिनंदन भुजबळ सर!!
अभिनंदन देवेंद्र जी
अभिनंदन श्री देवेन्द्र भुजबळ सर .
आदरणीय देवेंद्र जी, नमस्कार.
आपली निवड ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे . आपले खूप खूप अभिनंदन!