Wednesday, April 23, 2025
Homeबातम्यादेवेंद्र भुजबळ यांना रोटरी पुरस्कार जाहीर

देवेंद्र भुजबळ यांना रोटरी पुरस्कार जाहीर

प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे समाज कल्याणासाठी निवृत्तीपश्चातही सातत्याने योगदान देत असल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल या जगातील सर्वात मोठ्या, १२० वर्षे जुन्या स्वयंसेवी संस्थेच्या नवी मुंबई शाखेतर्फे श्री देवेंद्र भुजबळ यांना व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्री भुजबळ हे वृत्त पत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यानंतर व्यक्तिशः प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांतून यशकथा, लेख, वृत्तांत लिहून तसेच प्रेरणादायी पुस्तके लिहून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करीत आहेत, त्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

नवी मुंबईत उद्या होणार असलेल्या एका मोठ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या, नवी मुंबई सिवुड्स शाखेचे अध्यक्ष कपिल अगरवाल यांनी कळविले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. आदरणीय सर
    नमस्कार
    आपलं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
    धन्यवाद
    🙏🙏🙏

  2. माननीय श्री देवेंद्र भुजबळ सरांचे अभिनंदन!
    ‘न्यूज स्टोरी टुडे’ तर्फे खरच सकारात्मक विचारांची पेरणी ते करत आहेत.
    समाज माध्यमाद्वारे आज वाईट घटनांचा, बातम्यांचा मारा आमच्यावर इतका होत आहे की आम्ही खचून जातो.
    पण न्यूज स्टोरी टुडे मधून थोर पुरुषांचे विचार, लेखकांचे कार्य ,अनेक नागरिकांची क्रिएटिव्हिटी , अनेक प्रदेशांचे वर्णन, जीवनाला आवश्यक अशी माहिती समोर येत असते आणि हे वाचून मनाला उभारी येते.

  3. नमस्कार मंडळी.
    आपण दिलेल्या शुभेच्छा खूप महत्वाच्या आहेत.
    यामुळे काम करण्याचा हुरूप नक्कीच वाढेल.
    यापुढेही आपले सहकार्य,लोभ असाच कायम असू द्या अशी विनंती आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

  4. अतिशय गोड बातमी
    पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आदरणीय संपादक भुजबळ साहेब

  5. खूप छान बातमी.अभिनंदन सर आणि खूप खूप शुभेच्छा!

  6. अरे वाह… खूपच छान बातमी.
    अभिनंदन सर तुमचे… असेच दर्जेदार कार्य करत रहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता