समाज कल्याणासाठी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करीत असल्याबद्दल न्युज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ व पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना नुकतेच सर्वद पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक श्री. नरेशभाई राऊत आणि जेष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य यांना उत्तुंग कार्याबद्दल सर्वद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महत्त्वपूर्ण पुरस्कारांमध्ये रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ आशुतोष रारावीकर, सर्वद समाजसेवी पत्रकार पुरस्कार श्री. जगन्नाथ पाटील, सर्वद सामाजिक कार्य पुरस्कार श्री. महेश राऊत, विष्णू यादव, रमाकांत पाटील, प्रशांत आंम्ब्रे, प्रशांत वंजारे, ऋतुजा केळकर, प्राची पाटील आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री. महादेव रानडे यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवी श्री. ना. म. शिंदे आणि संत साहित्याच्या तज्ञ अभ्यासक श्रीमती प्राची गडकरी उपस्थित होत्या.
श्री.ना. म. शिंदे आणि अध्यक्ष श्री.महादेव रानडे यांनी आपल्या भाषणातून सर्वदच्या कार्याची प्रशंसा केली.
प्राची गडकरी यांनी पुरस्काराचे महत्त्व मिश्किल शैलीत विशद केले.
कार्यक्रमासाठी संचालक श्री. ओंकार देशमुख यांनी आकर्षक चित्रफिती बनवल्या होत्या. त्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या.
श्री. नरेश राऊत, डाॕ. अंजुषा पाटील यांनी सन्मान पुरस्कारास उत्तर म्हणून समयोचीत भाषण केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूञसंचालन प्रा डाॕ. सुचिता पाटील यांनी केले.
अभय इंटरनॅशनल स्कूल, विक्रोळी, मुंबई येथे झालेला हा सोहळा अतिशय नीटनेटकेपणा, नियोजनबद्ध आणि आनंदमयी वातावरणात पार पडला.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात दाखविण्यात आलेली चित्रफित आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
देवेंद्र भुजबळ सरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
देवेंद्रजी आणि अलकाजी, दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
Tq tq neela mam, ur wishes always boost our moral 🤝
भुजबळ साहेब त्रिवार अभिनंदन.
अभिनंदन अलकाजी. आपल्या कार्याचा उचित गौरव झाला याचा अत्यानंद झाला. आपले कार्य सेच पुढे चालू रहावे, त्याचा विस्तार व्हावा यासाठी शुभेच्छा
अभिनंदन
RTS congratulations Madam and Sir for achieving the Sarvad Award. We appreciate your verve and tenacity in making the News Story Today a Web Portal instrumental in social change and social awareness.
Best wishes for your future initiatives