Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यनवं वर्ष : काही कविता…

नवं वर्ष : काही कविता…

नववर्ष 2024

१. थोडं पुढे…थोडं मागे…

स्वतःलाच चाचपडत पाहू…
काय ग काय केलं तू…

2023 ला ..आठवतं का..
कुठे गेली होती का फिरायला..

काही सुंदर आठवणी…
आहेत का जपणाऱ्या..

कुणा कुणाला आनंद दिला…
कुणाला दिले का…
आपुलकीचे, विश्वासाचे बोल..

अडीअडचणीत केली का
कुणाला मदत…
बघ ना…

नाही ना ..?
केली कुणावर चिडचिड, रागराग..
आठव ग सारं…

नक्कीच अवलोकन करायचं…
तसं रोजच मनातल्या कप्प्यात..
शिरून बघायचं असतं..

पण आज तर हवंच…करायला..
तर मग पूर्ण वर्ष आली का फिरून…

चांगल्या गोष्टी बद्दल
कर धन्यवाद..

काही केल्या असतील चूका…
तर मनातच का होई ना ..
माफी माग..

दूखवलं असेल कुणाला तर
अगदी मनापासून..
क्षमा माग..

मनातल्याच परमेश्वराशी…
प्रामाणिक राहू या…

सुखदुःख, यश, अपयश,
मान, अपमान, क्लेश, त्रास होणारच
पण मन स्वच्छ, निर्मळ, आनंदी
तर जीवन पण किती छान

नवीन वर्षाचा
नविन संकल्प

स्वतःच स्वतःच अवलोकन
करत रोजचा नविन दिवस
आनंदमय आरोग्यमय
दिलखुलास जगायचं

पूर्णिमा शेंडे.

– पूर्णिमा शेंडे. मुंबई

२. सलाम तुझ्या निरोपाला 🙏

साक्षीदार तू
हर दिवसाचा
सहवास तुझा
जिवाभावाचा

वेचिता क्षण आनंदाचे
विरूनी जाती कारण दुःखाचे

निरोप देण्या भारावले मन,
कल्लोळ विचारांचा.
व्यथित भावनांचा.

आशीर्वाद तुझे
सदैव राहतील
कडू गोड आठवणी
सोबत करतील.

निसर्ग नियम
तुझीच रे शिकवण
भविष्यातही करशील
पाठराखण.

सलाम तुझ्या निरोपाला.
फिरून न येण्याच्या जिद्दीला.

स्मृतिगध तुझा
मनात साठवून
करीते स्वागत
नववर्षाचे आनंदून.

— मीरा जोशी

३. सरले वर्ष
🎸🍰🍻🍰🎸

पहाता पहाता सरले वर्ष
वळुनी पहाता आनंदी क्षण
करु नववर्षाचे स्वागत सहर्ष
जपुनी ठेवूया रम्य आठवण

सागरतीरीच्या लाटा लाटा
येत किनारी जात सागरा
नव वर्षाचा अनुभवु थाटा
हास्याचा असावा मग फवारा

अनुभव गाठी देऊनी गेले
मीतु पणाला दूर सारले
अहंभावास तिलांजली देता
मिळून सारे जग हे सजले

नकोत तंटे न् युद्ध विनाशी
मैत्रीभाव अन् स्नेह विलसावे
प्रार्थना करु त्या परमेशाशी
येते नववर्ष प्रमोदीत असावे

ऋणानुबंधी वीण घट्टसर
ओढ रहावी नात्यानात्यातील
वर्षे जातील कितीही सरसर
मने जाणतील मनामनातील

संकटे आली संकटे गेली
सरले सारे जुन्याच साली
नव आशेची कळी उमलली
सुवास प्राजक्त पहाट पसरली

— नेहा हजारे. ठाणें

४. नवेवर्ष

बोलबोलता गत साल संपले आनंदात
नुतन वर्षाचे स्वागत करु जल्लोषात।।धृ।।

जन्म-मृत्यू अटळ रथचक्र राहे चालत
काळ पुढे जाई कुणासाठी न थांबत
सूर्यास्तानंतर सूर्योदय होणार निश्चित।।1।।

कुणाचे कर्माची सुरवात कुणाचा शेवट
कष्ट करावे रहावे सकारात्मक सतत
काळच ठरवील कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ।।2।।

सुख-दुःखाच्या आठवणी उजळाव्यात
दुःख विसरावे आठवावे आनंदाचे क्षण
काय मिळवले हरवले याचा घ्यावा शोध।।3।।

स्विकारावे सुविधा नवीन शोध तंत्रज्ञान
जीवन पथावर चालावे नि:शंक जपून
समृद्ध सुखी जीवनाचा लुटावा आनंद ।।4।।

मागे वळून पहाता दोष चुका टाळाव्यात
प्रत्येक क्षणाचा करावा सदुपयोग सतत
रात्र सरेल येईल उद्याची शुभ पहाट।।5।।

व्यायाम करावा आहार असावा संयमित
सुबत्ता येईल सदा जपावे पर्यावरण
रोजनिशी चे संयोजनाची जपावी रीत ।।6।।

अरुण गांगल

अरुण गांगल. कर्जत -रायगड

. नववर्ष

नवी विचार, नवे स्वप्न
नव्या अपेक्षांचे घेऊन ओझे
होणार आहे सुरू नववर्ष
पुन्हा नव्याने तुझे अन् माझे

संकल्प करूया जिंकण्याचे
चल एकदा पुन्हा नव्याने
बहरने थांबते का कधी वृक्षाचे..?
थोडी सी पानगळ होण्याने

असेल वाट जरी जुनी
तरी उमटतील पाऊलखुणा नव्या
शोधताना दिशा नवी
आठवतील आठवणी जुन्या

थांबले न चक्र कधी काळाचे
वर्षा मागे वर्ष सरताना
का थांबावे मग क्षणासाठी
क्षण आयुष्याचे जगताना

नव्या पहाटेस नवा श्वास
रोज नव्याने भरावा
भरूनी पंखात बळ
नवा क्षितिज रोज शोधावा

नव्या वर्षाचे, नवे स्वागत
नव्या शब्दांनी करूया
विसरून सारे कालचे
नव्या दिवसात नवाने जगूया

पूनम सुलाने

पूनम सुलाने-सिंगल, जालना

६. स्वागत करूया नववर्षाचे
 
स्वागत नववर्षाचे करूया, अतीव आनंदाने |
सुख समृद्धी सर्वां देवो, कायम भगवंताने ||धृ||

नाताळ संपला, येईल आता, सण संक्रांतीचा|
तिळगुळ देता, ह्रदयी भीडू द्या, गोडवा वाणीचा ||
संकल्प करूया, कायम जोडू, समाज स्नेहाने |
सुख समृद्धी सर्वां देवो, कायम भगवंताने ||१||

खाऊ खिचडी, राम प्रहरी, धुंधुरमासाला |
स्नेही जनांचा, जमवू मेळा, प्रभात समयाला ||
आरोग्याच्या मिटवू चिंता, आसन ध्यानाने |
सुखसमृद्धी सर्वां देवो, कायम भगवंताने ||२||

माघ मासी गणेश जन्मला आनंद जगताला|
दर्शन घेण्या जाऊ मंदिरी, मागू विद्येला||
रथ सप्तमीस, प्रार्थू सूर्या, सूर्य नमस्काराने |
सुख समृद्धी सर्वा देवो कायम भगवंताने ||३||

वाईट अवगुण जाळून टाकू, फाल्गुन मासात |
नवचैतन्य घेवून येई, ऋतुराज वसंत ||
हिंदू नववर्ष, पाडव्यास येई, सोनपावलाने |
सुख समृद्धी सर्वा देवो कायम भगवंताने ||४||

प्रथम दिवस हा आज आला इंग्रजी सनाचा |
देण्या शुभेच्छा हाही आहे दिवस महत्वाचा||
नववर्षाची सुरवात करूया सुहास्य वदनाने |
सुख समृद्धी सर्वा देवो कायम भगवंताने ||५||

प्रवीण देशमुख

प्रवीण देशमुख. कल्याण

७. स्वागत नववर्षाचे

हे वर्ष नवे, सुख घेऊनि यावे,
वर्ष नवे, हे वर्ष नवे –// धृपद

बरसू देत अमृतधारा
स्वच्छंद वाहू दे वारा
ते बीज धरित्रीपोटी
येऊं दे तरारून आतां
आळसा न द्यावा थारा
ये समृध्दी बहारा
हातांस मिळू द्या कामे,
चैतन्य नवे खेळावे //1//

नवविज्ञानाच्या योगे
क्रान्तीस मिळावी साथ
आसेतू-हिमाचल प्रान्ती
गंगौघ वाहू दे नित्य
गंगा, यमुना, सिंधू
कावेरी जला जोडावे
हे प्रांतभेद नि वैर
जलधारांतूनी संपावे //2//

जन्मा येता प्राणी
जगण्याचा हो अधिकारी
तुम्ही जगा, जगूं द्या त्याला
माणुसकी जागवा खरी
द्या अस्त्रशस्त्र टाकून
जोडू या बंध नात्याचे
संदेश शांतीदूताचा,
माणसापरी वागावे //3//

वाढू द्या प्रेम सर्वांचे
या भारतदेशावरचे
उसळोत भारतीहृदयी
राष्ट्रप्रेम लहरी लहरी
या विविधरंगी देशाचा
आनंद लुटावा खासा
मुक्तांगणी विहरत राहो,
हा पक्षी मम राष्ट्राचा //4//

स्वाती दामले

— स्वाती दामले.
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नविन वर्षाचे स्वागत छानच झाले आहे प्रत्येक कविता अप्रतिम आहे. सुंदर शब्दात कवयित्रीने कवितेच्या माध्यमातून नववर्षाचे छान स्वागत केले आहे. सर्वांना नविन वर्षाच्या अनेक शुभेच्छां.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ