नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर सभागृह वाशी सेक्टर – ६ येथे सुंदर अश्या ‘श्रावणरंग २०२४’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
नव्या उमद्या कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा या हेतूने आयोजीत केलेल्या या श्रावणरंगात, रसिक प्रेक्षकांच्या मनाला तृप्त करणाऱ्या कला, वादन, गायन यांच्या उत्तम सादरीकरणातून श्रावणरंग कार्यक्रमास बहर येत गेली.
मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अपेक्षा व निरंजन यांच्या समूहाने सुंदर असे गणेश वंदन आणि देवी वंदन सादर करून श्रावणरंगाची सुंदर अशी सुरुवात केली.
नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या सेक्रेटरी अमरजा चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सृजन सृष्टीचा नवा अविष्कार दाखविणारा श्रावण महिन्याच्या बुधवारी रसिक प्रेक्षकांनी आनंद तर लुटलाच शिवाय तीन भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून विशेष भेटवस्तू ही देण्यात आल्या.
सुमधूर आवाजातील शीला कुमार यांचे, ‘दिस चार झाले मन’ गाणे आणि त्यानंतर मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ यांच्या ‘पंढरीची वारी ते श्रावण’ या सादरीकरणारे रसिक प्रेक्षकांचे मन अगदी भारावून गेले.
विशेषत: साहित्य मंदिराचे अध्यक्ष अवघे ८० वर्षे वय असलेल्या सुभाष कुलकर्णी यांच्या दिमाखदार, अस्सल कोळीवेषातील एंट्रीने साऱ्यांचीच मने जिंकली. साहित्य मंदिरच्या कलाकारांनी वारकरी पंरपरेतील भक्तीरसातील विठ्ठल नामाचा गजर करत रसिकांना विठुरायाच्या पंढरीचे दर्शन घडविले.
“जन्म लाभला मला पुन्हा तर पाऊस होईन म्हणतो, विश्वामधल्या चराचराशी जोडून घ्यावे म्हणतो” असा ज्ञानेशाच्या विश्व बंधुत्व आशयघनी कविता, जेष्ठ गझलकार श्री.आप्पा ठाकूर यांनी आषाढ – श्रावण गझलांनी मन चिंब न्हाले ! कल्पना देशमुख, शैफाली जैन, रंजना देशपांडे, महेश गरदे, अक्षय भोसले, माधुरी आणि महेश बनकर, अकीक लाड यासर्वांच्या सुंदर अश्या गाण्यांनी कार्यक्रमात छान रंगत आणली.
परिसर सखी स्त्री मुक्ती संघटनेच्या रुक्मिणी पॉल यांनी कचरा वेचक महिलांचे प्रतिनिधित्व करत आपले मनोगत व्यक्त केले.
तेजस्विनी महिला मंडळाच्या ‘वसा श्रावणाचा’ या पथनाट्याने एक प्रेरणेची ऊर्जा प्रज्वलित करत स्त्रीसक्षमिकरणाचा संदेश दिला. नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या हर्षिता बेंद्रे यांच्या सुंदर सादरीकरणाने साऱ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.
यशस्विनी कला मंच यांनी सादर केलेल्या मंगलागौरीच्या खेळांनी श्रावणरंग कार्यक्रमात एक वेगळीच मजा आणली.
शेवटी नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल यांच्या टिनकुजिया या गोड नाटकाने सभागृहात हास्याच्या श्रावणसरी बरसल्या..
नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, नवी मुंबई म्युझिक ऑॅण्ड ड्रामा सर्कलच्या अध्यक्षा वासंती भगत, समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.अंजली देसाई, एस. आर. दळवी, फाऊंडेशन – सौ.सीता दळवी, ज्येष्ठ कवी, गझलकार श्री.आप्पा ठाकूर, न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेन्द्र भुजबळ, सौ.अलका भुजबळ, डाॅ.अशोक पाटील, जेष्ठ कवी श्री.साहेबराव ठाणगे, अनेक सामाजिक संस्थांचे मान्यवर प्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.
जेष्ठ नाट्यकर्मी, लेखक, कवी श्री.रवींद्र वाडकर यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले.
प्रा.वर्षा भोसले, सौ.नेत्रा शिर्के, सौ.देवयानी गायकवाड, वैभव गायकवाड यानी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
निवेदिका कोमल झेंडे यांनी आपल्या निवेदनातून कार्यक्रमाची सुंदर गुंफण घातली. भरगच्च रसिकांच्या उपस्थितीत “श्रावणरंग“ हा कार्यक्रम संपन्न झाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800