नमस्कार मंडळी,
आज आपल्या पोर्टलवर आपण नवे कवी (आपल्यासाठी) श्री हेमंत मुसरीफ यांच्या काही कविता सादर करीत आहोत.
अल्प परिचय :- श्री हेमंत मुसरीफ हे बँक ऑफ महाराष्ट्र मधून उपमहाप्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत.
श्री हेमंत मुसरीफ यांची पहिली कविता अवघ्या तेराव्या वर्षी “आनंद” मासिकात प्रसिद्ध झाली. तदनंतर असंख्य कविता प्रकाशित झाल्या. त्यांची कविता बालभारती पहिली पाठ्यपुस्तकात आहे. या पूर्वीही २ कविता पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाल्या होत्या. रोज ५०/६० जागी त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. आता पर्यंत सुमारे त्यांच्या ८४ हजार कविता आणि २०० लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितांची www.kavyakusum.com ही वेब साईट आहे. त्यांचे टिव्ही व रेडीओवर ही कार्यक्रम झाले आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात श्री हेमंत मुसरीफ यांचे हार्दिक स्वागत आहे.
१. कागदी झेंडा
कागदी झेंडा छोटा
टाचला छान शर्टाला
टाचणी ती टोकदार
टोचली जरा बोटाला
रक्त आले थेंब भर
वेदना होती जीवाला
रक्ताळले बोट माझे
दावीत फिरे सर्वांला
झेंडा हसला इवला
बोलू लागला मनाला
शहीदाचे ते बलीदान
आठवा इतिहासाला
रक्ताळल्या शरीरांनी
चुंबलेहसत फासाला
राख रांगोळी घरांची
स्वतंत्र करती देशाला
निथळत्या घामासम
किंमत स्वतंत्ररक्ताला
बलिदान सर्वोच्चदान
बळकटी दे तख्ताला
इवल्याशा झेंड्यानी
शिकविले रे खुजाला
चुककळे माझी मला
सलाम करे ध्वजाला
सार्थरंगत आणली रे
या स्वतंत्रता सणाला
शहीदांचे ते समर्पण
आठव क्षणा क्षणाला
२. झेंडा ..
कागदी झेंडा छोटा
कोटा लावला छान
बदलले माझे रुपडे
ताठ आपसूक मान
भरून आलायं ऊर
हरपून चालले भान
गायला लागलेओठ
जन गण मन गान
स्फुल्लिंग तेजाळले
संतृप्त जाहले कान
फुलून आली छाती
तिरंगा अपनी जान
तिरंग्या पुढे खुजे हे
वाटू लागले जहान
आगळी तया कथा
भविष्य तया महान
दुसरे काही ना प्रिय
आता तिरंग्यासमान
शत कोटींचे वाढला
देशाभिमान सन्मान
माझी माती माझा देश
संदेश अत्युच्च महान
आत्मीय वसुधावंदन
जरी गोष्ट वाटे लहान
हृदयामिळे समाधान
जाणूनघेता संविधान
एका प्रसंगे सावधान
जाणवे मज अवधान
३. प्रजातंत्र दिवस ..
ध्वज संहिता समग्र
जाणून घेऊ माहिती
स्वर्ण इतिहास गातो
तिरंगा झेंडा महती
केशरी धवल हिरवा
तिरंगा आयताकृती
आबाल वृद्धां मनात
ठसली सार्थआकृती
अमृतोत्सव निमीत्ते
समजून घ्या संस्कृती
ध्वज वंदन ससन्मान
पाळावी समग्रपध्दत
ध्वज न मात्र निशाण
असे अमोल संपत्ती
रोचक आहे कहाणी
कशी झाली उत्पत्ती
सर्व पक्षा भिन्न झेंडा
करती तयावर प्रिती
तिरंगा सर्वां प्रियतम
सन्मानाचा सर्वाप्रति
प्रजातंत्र महत्व कसे
जाणू अद्भुतअनुभूती
ध्वजाची विशेष निगा
उत्सव सरल्या वरती
जाणून घ्या संविधान
उक्ती तशीचं हो कृती
ध्वज संहिता पाळूनि
सजवूसाजरी आकृती
४. प्रगत भारत ..
बलशाली हा भारत
करी विश्वाचे सारथ
विश्वास दृढ मनात
लोकशाही सुदृढरथ
अनुभवाचे बोल ते
इतिहास ये सांगत
पुर्वजआशीषसहीत
विज्ञानाची घे संगत
धावाया लागे आज
काल होतो रांगत
भारत केवढा प्रगत
पाहे तारांगण पंगत
राही जागृत जागत
ना होणारं फसगत
सापांशी खेळण्याची
कला आहे अवगत
एकला होतो चालत
डोळ्यां कुणा सलत
आम्ही निघालो पुढे
वाईट त्यांची हालत
अमृतवर्षानुभव असे
सततप्रयास भगिरत
शिखरे गाठतो प्रगत
दमदार चालेअविरत
जे जे करती संगत
शत्रुचेहीअसे स्वागत
इच्छामनी हीचं असे
प्रगत हो सारे जगत

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800